शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

बजेटमध्ये येणार मोटोरोलाचा शानदार फोन; 5000mAh बॅटरीसह Moto G31 येऊ शकतो बाजारात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 18:59 IST

Budget Smartphone Moto G31: Moto G31 स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5,000 mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो ज्याची किंमत 210 डॉलर असू शकते.

गेल्या आठवड्यात मोटोरोलाने भारतात आपला जबरदस्त स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने 36,999 रुपयांमध्ये Motorola Edge 20 Pro देशात आणला आहे. हा एक मिड प्रीमियम स्मार्टफोन आहे जो 108MP च्या कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. आता मोटोरोलाच्या एका बजेट स्मार्टफोन Moto G31 ची माहिती समोर आली आहे. Moto G31 स्मार्टफोन 50MP कॅमेरा आणि 5,000 mAh बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.  

Moto G31 ची माहिती एक टिपस्टरने ट्वीटरवरून दिली आहे. या ट्विटमध्ये या फोनच्या रियर पॅनलचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. Motorola Moto G31 च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन मिळतील. त्याचबरोबर गुगल असिस्टंट बटण देखील मिळू शकतो. फोनच्या वरच्या बाजूला 3.5एमएम जॅक आणि खालच्या बाजूला यूएसबी टाईप सी पोर्ट व स्पिकर मिळेल. 

या फोटोनुसार हा फोन सिल्वर कलर शेडसह सादर केला जाऊ शकतो. बॅक पॅनलवर डावीकडे आयताकृती ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे. या सेटअपच्या डावीकडे एलईडी फ्लॅश लाईटसह आहे. बॅक पॅनलवरील कंपनीचा लोगो फिंगरप्रिंट सेन्सरचे देखील काम करेल.  

लीकनुसार या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा मिळेल. या फोनमध्ये 10वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारी 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. लिक्सटरने मोटो जी31 ची किंमत 210 डॉलर असेल. ही किंमत 15,000 रुपयांच्या आसपास रूपांतरित होते, त्यामुळे हा फोन एक बजेट फोन असू शकतो.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान