शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
5
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
6
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
7
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
8
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
9
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
10
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
11
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
12
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
13
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
14
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
15
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
16
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
17
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
18
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
19
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
20
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले

पुढील आठवड्यात भारतात येतोय Motorola चा स्वस्त 5G Phone; जाणून घ्या कसा आहे Moto G51 5G  

By सिद्धेश जाधव | Updated: December 3, 2021 11:52 IST

Motorola Moto G51 5G Phone Price In India: Motorola पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं सांगण्यात आलं आहे.  

Motorola नं जागतिक बाजारात लाँच केलेले G सीरीजमधील फोन भारतात आणण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात Moto G31 स्मार्टफोन देशात आणल्यानंतर आता कंपनी 5G Phone सादर करणार आहे. कंपनी पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. टिपस्टर मुकुल शर्मानं 10 डिसेंबर ही तारीख दिली आहे. तसेच हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं देखील सांगण्यात आलं आहे.  

Moto G51 5G Phone ची किंमत 

Motorola लवकरच भारतात Moto G51 5G स्मार्टफोन सादर करणार आहे. हा फोन याआधी युरोपात लाँच झाल्यामुळे या फोनच्या भारतीय किंमतीचा अंदाज लावणं सोपं झालं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, Moto G51 5G स्मार्टफोन 20,000 रुपयांमध्ये सादर केला जाऊ शकतो. कारण युरोपियन बाजारात या फोनची किंमत 229.99 यूरो अर्थात सुमारे 19,400 रुपये ठेवण्यात आली होती.  

Moto G51 5G Phone चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Moto G51 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट, गुगल असिस्टंट बटन, IP52 रेटिंग, डॉल्बी अ‍ॅटमॉस आणि साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.   

Moto G51 चा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात LED फ्लॅश असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. ज्याला 2MP च्या मॅक्रो कॅमेरा आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.    

Moto G51 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. तसेच हा फोन ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU ला सपोर्ट करतो. कंपनीने हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या मोटोरोलाच्या 5G Phone मधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान