शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
3
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
4
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
5
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
6
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
7
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
8
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
9
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
10
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
11
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
12
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
13
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
14
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
15
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
16
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
17
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
18
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
19
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच 

By सिद्धेश जाधव | Updated: July 27, 2021 12:09 IST

Motorola Edge 20 series: Motorola Edge 20 सीरिजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन्स लाँच केले जातील.

Motorola लवकरच मिड रेंजमध्ये आपली नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. Motorola Edge 20 सीरिजच्या लाँच डेटचा आता खुलासा झाला आहे. Motorola ने अधिकृतपणे सांगितले आहे कि 5 ऑगस्टला चीनमध्ये Motorola Edge 20 सीरीजचे हँडसेट सादर केले जातील. कंपनीने आपल्या अधिकृत वीबो हँडलवरून ही माहिती दिली आहे. या सीरीजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन्स लाँच केले जातील, अशी चर्चा आहे.  

Motorola Edge 20 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

काही दिवसांपूर्वी मोटोरोला एज 20 प्रो स्मार्टफोन एनबीटीसी सर्टिफिकेशन साईटवर मॉडेल नंबर XT-2153-1 सह लिस्ट झाला होता. दुसरीकडे Motorola Edge 20 स्मार्टफोनमध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. याआधी आलेल्या लिक्सनुसार या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 870 SoC असेल. तसेच हा फोन 6GB,8GB आणि 12GB रॅम व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. हा मोटोरोला फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 108MP चा मुख्य कॅमेरा असू शकतो. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4230mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल.  

चिनी सर्टिफिकेशन साइट TENAA वर देखील Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी लिस्ट करण्यात आले होते. या लिस्टिंगमधून Motorola Edge 20 च्या स्पेसिफिकेशनसह रेंडर्स देखील लीक झाले होते. लीकनुसार मोटोरोला एज 20 मध्ये मोठा डिस्प्ले आणि फ्रंट कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउटसह सादर केला जाईल.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड