शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह Motorola Edge 20 Pro येणार भारतात; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती  

By सिद्धेश जाधव | Updated: August 19, 2021 19:03 IST

Motorola Edge 20 Pro India: Motorola Edge 20 सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. मोटोरोला इंडियाच्या प्रमुखांनी Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन देशात सादर करणार असल्याची माहिती दिली आहे.  

Motorola edge 20 pro launched confirtmed in india with 144hz refresh rate and 108mp camera setup 

नुकतेच मोटोरोलाने आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत Motorola Edge 20 सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Fusion नावाने भारतात सादर करण्यात आले आहेत. परंतु आता या सीरिजमधील Pro स्मार्टफोनची वाट मोटोरोलाचे चाहते बघत आहेत. आता मोटोरोला इंडियाच्या प्रमुखांनी सांगितले आहे कि Motorola Edge 20 Pro लवकरच भारतात येणार आहे.  

मोटोरोला इंडिया हेड प्रशांत मनी यांनी ट्वीट करून सांगितले आहे की, चीनमध्ये Motorola Edge S Pro नावाने सादर झालेला स्मार्टफोन भारतात लवकरच Motorola Edge 20 Pro नावाने सादर केला जाईल. एका ट्विटर युजरने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत यांनी ही माहिती दिली आहे.  

Motorola Edge S Pro चे स्पेसिफिकेशन्स  

Motorola Edge S Pro मध्ये 6.7-इंचाचा ओएलईडी होल डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 870 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 12GB पर्यंतचा Turbo LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेजसह मिळते. हा फोन अँड्रॉइड 11 वर आधारित MYUI 2.0 स्किनवर चालतो.  

या मोटोरोला स्मार्टफोनचा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य कॅमेरा 108 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. त्याचबरोबर 16 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड अँगल लेन्स आणि एक 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे जी 5x ऑप्टिकल झूम आणि 50x डिजिटल झूमला सपोर्ट करते. हा फोन सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Motorola Edge S Pro मध्ये 4,520mAh ची बॅटरी 30W टर्बोपावर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

Motorola Edge S Pro ची किंमत  

Motorola Edge S Pro स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये चार व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे. या फोनचा छोटा मॉडेल 6GB रॅम + 128GB स्टोरेजसह 2399 युआन (अंदाजे 27,500) रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर फोनचा 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल 2699 युआन (अंदाजे 31,000 रुपये), 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल 2999 युआन (अंदाजे 34500 रुपये) आणि 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 3299 युआन (अंदाजे 37,800 रुपये) मध्ये विकत घेता येईल. 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान