शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोटो जी ६ व जी ६ प्लेच्या आगमानाची नांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 19:47 IST

मोटोरोला कंपनीने आपल्या जी सेरीजमधील मोटो जी ६ आणि जी ६ प्ले हे दोन नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याचे संकेत दिले असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे.

मोटोरोला कंपनीने आपल्या जी सेरीजमधील मोटो जी ६ आणि जी ६ प्ले हे दोन नवीन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्याचे संकेत दिले असून याचा टिझर जारी करण्यात आला आहे. लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला कंपनीने गत महिन्यात मोटो जी ६, मोटो जी६ प्लेस आणि मोटो जी६ प्लस हे तीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. याला पहिल्यांदा ब्राझीलमध्ये उपलब्ध करण्यात आले होते. आता यापैकी मोटो जी ६ आणि मोटो जी ६ प्ले हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे संकेत कंपनीने दिले आहे. मोटो जी ६ आणि जी ६ प्ले यांच्यातील बहुतांश फिचर्स समान असून फक्त प्रोसेसर, बॅटरी आणि कॅमेर्‍यात बदल करण्यात आला आहे.  

मोटो जी ६ हा स्मार्टफोन ५.७ इंच आकारमानाचा, १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा आणि फुल एचडी प्लस(२१६० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेच्या डिस्प्लेने सज्ज आहे. यामध्ये क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४५० प्रोसेसर आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा आहे. यामध्ये एफ/१.८ अपार्चर आणि ७६ अंशातील लेन्स असणारा १२ मेगापिक्सल्सचा एक तर एफ/२.२ अपार्चर व ७९ अंशाची लेन्स असणारा ५ मेगापिक्सल्सचा दुसरा असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ड्युअल एलईडी फ्लॅशसह यात ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असेल. हे मॉडेल अँड्रॉइडच्या ओरिओ या आवृत्तीवर चालणारे असून यात टर्बोचार्ज तंत्रज्ञानाच्या सपोर्टने युक्त असणारी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी आहे.

मोटो जी ६ प्ले या मॉडेलमध्येही ५.७ इंच आकारमानाचा आणि १९:८ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले असला तरी तो एचडी रेझोल्युशनचा आहे. यात क्वॉलकॉमचा ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि स्टोअरेज ३२ जीबी असून ते वाढविण्याची सुविधा असेल. याच्या मागील बाजूस एफ/२.० अपार्चरयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा असून यातील फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सल्सचा आहे. तर यातील बॅटरी ४,००० मिलीअँपिअर क्षमतेची देण्यात आली आहे.

मोटो जी ६, आणि जी ६ प्ले या मॉडेल्सला अनुक्रमे २४९ डॉलर्स (सुमारे १६५०० रूपये) आणि १९९ डॉलर्स (सुमारे १३,००० रूपये) या मूल्यांमध्ये बाजारपेठेत उतारण्यात आले आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेतही यांचे मूल्य याच्याच आसपास असू शकते. या दोन्ही मॉडेलच्या माध्यमातून मोटोरोला कंपनी पुन्हा एकदा मिड-रेंजवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.