शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस भारतात लाँच

By शेखर पाटील | Updated: August 29, 2017 13:30 IST

मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि  मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदुसर्‍या मॉडेलमध्ये काही दर्जेदार फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत.मोटो जी ५ एसमध्ये ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर तर दुसर्‍या मॉडेलमध्ये ऑक्टॉकोअर ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे.मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.

मोटोरोला कंपनीने आपले मोटो जी ५ एस आणि  मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत अनुक्रमे १३,९९९ आणि १५,९९९ रूपये मूल्यात लाँच केले असून ते अमेझॉन इंडियावरून उपलब्ध करण्यात आले आहेत.ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला मोबॅलिटी या कंपनीने मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. हे दोन्ही मॉडेल २९ ऑगस्ट रोजी एका शानदार कार्यक्रमात भारतात लाँच करण्यात आले. खर तर मोटो जी ५ एस आणि मोटो जी ५ एस प्लस या दोन्ही मॉडेलमधील बहुतांश फिचर्स सारखे असले तरी दुसर्‍या मॉडेलमध्ये काही दर्जेदार फिचर्स प्रदान करण्यात आले आहेत. आता हे दोन्ही मॉडेल भारतीय ग्राहकांना खरेदी करता येईल.मोटो जी ५ एसमध्ये ५.२ इंच तर  मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १९२० बाय १०८० पिक्सल्स म्हणजेच फुल एचडी क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले असून यावर कॉर्निंग गोरीला ग्लास ३ चे संरक्षक आवरण असेल. मोटो जी ५ एसमध्ये ऑक्टॉ-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर तर दुसर्‍या मॉडेलमध्ये ऑक्टॉकोअर ६२५ प्रोसेसर देण्यात आला आहे. मोटो जी ५ एसची रॅम तीन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. तर मोटो जी ५ एस प्लस मध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असून यातही मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल.मोटो जी ५ एस या मॉडेलमध्ये फास्ट फोकस पीडीएएफ या फिचर्सने युक्त १६ मेगापिक्सल्सचा मुख्य तर ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे मोटो जी ५ एस प्लस या मॉडेलमध्ये ड्युअल कॅमेरे आहेत. अर्थात याच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे असून यातील एक मोनोक्रोम तर दुसरा आरजीबी असेल. यात डेप्थ सेन्सींग आणि प्रोफेशनल मोडही असेल. याच्या मदतीने फोर-के क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण शक्य आहे. यात एफ/२.० अपार्चर आणि ड्युअल एलईडी फ्लॅशची सुविधा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या मॉडेलमध्ये एलईडी फ्लॅश, वाईड अँगल लेन्स आणि एफ/२.० अपार्चरसह ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या मॉडेल्समध्ये टर्बो पॉवर चार्जरसह ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती फक्त १५ मिनिटांच्या चार्जींगवर सहा तासांपर्यंत चालू शकते असे कंपनीने नमूद केले आहे. मोटो जी ५ एस व प्लस हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१.१ नोगट या आवृत्तीवर चालणारे असून लवकरच याला अँड्रॉइड ‘ओ’चा सपोर्ट प्रदान करण्यात येणार आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनरसह वाय-फाय, ब्ल्यू-टुथ, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, युएसबी टाईप-सी, ऑडिओ जॅक, फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट आदी फिचर्स असतील. तर यात फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील देण्यात आले आहे. आज रात्रीपासून हे दोन्ही स्मार्टफोन ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. याशिवाय हे मॉडेल्स ‘मोटो हब’मधूनही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे कंपनीने आजच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे. विशेष म्हणजे अमेझॉनवर मोटो जी ५ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपयांच्या विशेष मूल्यात उपलब्ध करण्यात आले आहे.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान