शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
3
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
4
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
5
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
6
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
7
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
8
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
9
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
10
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
11
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
12
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
13
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
14
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
15
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
19
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
20
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
Daily Top 2Weekly Top 5

स्मूद डिस्प्ले, शानदार कॅमेरा आणि दमदार बॅटरीसह Moto G51 5G Phone आला बाजारात; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: November 3, 2021 17:48 IST

Moto G51 Phone Launch Price And Details: Moto G51 मध्ये Snapdragon 480+ प्रोसेसर, 5000mAh Battery आणि 8GB RAM देण्यात आला आहे.  

मोटोरोलाने आपला नवीन बजेट फ्रेंडली 5G Phone चीनमध्ये Moto G51 नावाने सादर केला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 480+ चिपसेट, 5000mAh Battery देण्यात आली आहे. या स्वस्त फोनमध्ये ट्रिपल मागे 50MP Camera देखील देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Moto G51 स्मार्टफोनची किंमत आणि वैशिष्ट्ये.  

Moto G51 price  

Moto G51 चीनमध्ये 1,499 युआनमध्ये सादर करण्यात आला आहे, म्हणजे सुमारे 17,500 रुपये. ही किंमत 8GB RAM आणि 128GB स्टोरेज असलेल्या एकमेव व्हेरिएंटची आहे. हा फोन ब्लु आणि ग्रे कलरमध्ये विकत घेता येईल. हा फोन कधी उपलब्ध होईल हे मात्र अजून स्पष्ट झाले नाही 

Moto G51 चे स्पेसिफिकेशन्स  

स्पेसिफिकेशन्स पाहता Moto G51 मध्ये 6.8-इंचाचा पंच होल असलेला एलसीडी डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. वर सांगितल्याप्रमाणे या डिवाइसमध्ये 2.2GHz स्पीड असलेला Qualcomm Snapdragon 480+ SoC देण्यात आला आहे. त्याचबरोबर 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. सोबत कंपनीने 3GB वर्चुअल रॅम देखील दिला आहे.  

फोटोग्राफी सेगमेंटबद्दल बोलायचे झाले तर, Moto G51 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा मुख्य सेन्सर, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा थर्ड सेन्सर मिळतो.  

Moto G51 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात डॉल्बी अ‍ॅटमॉस सपोर्ट देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम फोन आहे, जो 5G, Wi-Fi 5, Bluetooth v5.2, GPS,  USB Type-C port आणि 3.5mm ऑडिओ जॅक अशा कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह बाजारात आला आहे.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान