शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

आजपासून फ्लिपकार्टवर Moto G32 सेल सुरू; मिळतोय तगडा डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 16:32 IST

मोटोरोला कंपनीने मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन सीरिजचा जी३२ स्मार्टफोन लॉंच केला होता.

नवी दिल्ली : मोटोरोला कंपनीने (Motorola Company) मागील आठवड्यात भारतीय बाजारपेठेत आपल्या नवीन सीरिजचा जी३२ (G32) स्मार्टफोन लॉंच केला होता. कंपनीने आजपासून मोटो जी३२ ग्राहकांसाठी फ्लिपकॉर्टवर (Flipkart) खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. या मोबाईलच्या खास फिचर्सबद्दल भाष्य करायचे झाले तर, फुल-एचडी रिझोल्यूशनसह या नवीन हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट वापरण्यात आला आहे. फ्लिपकार्टवर सेल सुरू होण्यापूर्वी मोटो G32 स्मार्टफोनची किंमत, फिचर्स आणि फोन सोबत मिळणाऱ्या ऑफर्सची बरीच चर्चा रंगली होती. चला तर मग जाणून घेऊया आकर्षित करणाऱ्या काही तगड्या ऑफर्सबद्दल. 

ऑफर्स मोटो जी३२ खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एचडीएफसी (HDFC) बॅंक क्रेडिट कार्डवर १० टक्के त्वरित डिस्काउंट मिळेल. म्हणजेच एका कार्डमागे १,२५० रूपयांची सूट मिळेल. जर ग्राहकाकडे हे कार्ड असेल तर त्यांना हा स्मार्टफोन ११,७०० रूपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याशिवाय जिओ ऑफर देखील देण्यात आली आहे, ज्याअंतर्गत युजर्सना २,५४९ रूपयांपर्यंत सूट मिळेल.

Moto G32ची वैशिष्ट्येसॉफ्टवेअर आणि डिस्प्ले - या फोनमध्ये ६.५ इंचाचा डिस्प्ले स्क्रीन आहे, जो फुल HD + डिस्प्ले देईल. कॅमेरा - फोनच्या मागील बाजूस एक ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपचे फिचर्स देण्यात आले आहे. ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेंसर, याशिवाय ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. विशेष म्हणजे सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. प्रोसेसर आणि रॅम - फोन व्यवस्थित चालण्यासाठी आणि युजर्संना त्याचा चांगला लाभ घेण्यासाठी ६८० चिपसेट शिवाय ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेजची सुविधा देण्यात आली आहे. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज १ टीबीपर्यंत वाढवले जाऊ शकते. बॅटरी - ५००० mAh  बॅटरी फोनला ऊर्जा देण्याचे काम करेल, जी बॅटरी 33W टर्बोपॉवर लवकर चार्जिंग होण्यास सपोर्ट करते. 

या बहुचर्चित स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत १२,९९९ रूपये आहे. ग्राहकांना हा स्मार्टफोन मिनरल ग्रे आणि सॅटिन सिल्व्हर या २ कलरमध्ये खरेदी करता येणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे मंगळवारी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री करण्यास सुरूवात झाली आहे. तसेच या फोनचे वजन १८४ ग्रॅम एवढे आहे.

 

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोनFlipkartफ्लिपकार्टsaleविक्री