शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सर्वात स्वस्त स्मार्टफोन! 5000mah बॅटरी, 4 कॅमेऱ्यांसह Moto E32s लाँच, जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: June 2, 2022 17:04 IST

मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन Moto E32s भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे.  

Moto E32s Launched in India Check price and Specs Motorola नं ठरल्याप्रमाणे आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. कंपनीनं आपल्या E-सीरीजचा विस्तार करत Moto E32s स्मार्टफोन देशात लाँच केला आहे. MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी असलेल्या या डिवाइसची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. या बजेटमध्ये कंपनीला मोठ्या स्पर्धेचा सामना करावा लागणार आहे.  

Moto E32s चे स्पेसिफिकेशन्स  

यात 6.5-inch HD+ MaxVision डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. तसेच, फोन MediaTek Helio G37 प्रोसेसरसह बाजारात आला आहे. ग्राफिक्ससाठी IMG PowerVR GE8320 GPU देण्यात आला आहे. सोबत 4GB पर्यंत RAM आणि 64GB पर्यंतची स्टोरेज आहे. मोटो ई32एस स्मार्टफोन Android 12-बेस्ड MyUX skin वर चालतो.  सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड-माउंटिड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

फोटोग्राफीसाठी Moto E32s मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यातील मुख्य कॅमेरा 16MP चा आहे. तसेच यात 2MP चा डेप्थ सेन्सर आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या मोटोरोला फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Moto E32s ची किंमत  

Moto E32s स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. यातील 3GB रॅम व 32GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. तर 4GB रॅम व 64GB स्टोरेज मॉडेलसाठी 9,999 रुपये मोजावे लागतील. लाँच ऑफर अंतर्गत हा फोन 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Flipkart, Reliance Digital, आणि Jio Mart वरून 6 जूनपासून स्लेट ग्रे आणि मिस्टी सिल्वर कलरमध्ये विकत घेता येईल.  

टॅग्स :MotorolaमोटोरोलाSmartphoneस्मार्टफोन