शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Jio, Airtel, Vi ला मोठा धक्का; महागड्या रिचार्जमुळे 1 कोटी ग्राहकांनी सोडली साथ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 18:47 IST

Mobile Subscriber Base: गेल्या काही महिन्यांत BSNL च्या ग्राहकांची संख्या वाढऊन 9.18 कोटींवर पोहोचली आहे.

Mobile Tariff Hike: देशातील तीन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी जून 2024 मध्ये आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्या होत्या. यामहागड्या दरांमुळे कंपन्यांच्या ग्राहकांच्या संख्येत सलग तिसऱ्या महिन्यात मोठी घट झाली आहे. सर्वात मोठा फटका मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहाची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओला बसला आहे. टेलिकॉम सेक्टर रेग्युलेटर ट्रायच्या मते, रिलायन्स जिओने सप्टेंबर 2024 मध्ये 7.9 मिलियन किंवा 79 लाख ग्राहक गमावले आहेत.

जिओच्या ग्राहक संख्येत मोठी घटभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने सप्टेंबर 2024 साठी देशातील दूरसंचार ग्राहकांचा डेटा जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात रिलायन्स जिओच्या मोबाईल ग्राहकांच्या संख्येत 7.9 मिलियन, म्हणजेच 79 लाखांची घट झाली आहे. ऑगस्ट महिन्यात रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या 47.17 कोटी होती, जी सप्टेंबर महिन्यात 46.37 कोटींवर आली आहे.

व्होडाफोन आयडिया - भारती एअरटेललाही धक्का तिसरी सर्वात मोठी मोबाइल कंपनी व्होडाफोन आयडिया ग्राहक गमावण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या संख्येत 15 लाखांनी घट झाली आहे. वोडाफोन आयडियाचे ऑगस्टमध्ये एकूण 21.40 कोटी ग्राहक होते, जे सप्टेंबर महिन्यात 21.24 कोटींवर आले आहेत. याशिवाय, भारती एअरटेलच्या ग्राहकांची संख्याही 14 लाखांनी कमी होऊन 38.34 कोटींवर आली आहे.

BSNL चा फायदाएकीकडे खासगी कंपन्या ग्राहक गमावत आहेत, तर दुसरीकडे सरकारी सरकारी दूरसंचार कंपनी BSNL च्या ग्राहकांच्या संख्येत सप्टेंबर महिन्यात वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या 8.49 लाखांनी वाढून, 9.18 कोटींवर पोहोचली आहे.

 

टॅग्स :BSNLबीएसएनएलJioजिओAirtelएअरटेलVodafone Ideaव्होडाफोन आयडिया (व्ही)Smartphoneस्मार्टफोन