शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल डेटावर होऊ शकतो हल्ला, राहा सावध; आला नवा स्पायवेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 06:44 IST

स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

अनेकांच्या मोबाइलमध्ये त्यांच्या नकळत घुसून डेटा लीक करणारे एक स्पायवेअर बाजारात आले आहे. त्यामुळे अनेक स्मार्टफोनधारकांचा डेटा धोक्यात येऊ शकतो. या स्पायवेअरपासून सावध राहण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. धोका काय?हा स्पायवेअर स्मार्टफोनमध्ये गेल्यास कॉल रेकॉर्ड, डेटा, मेसेजेस, फोटो, ब्राऊजिंग हिस्ट्री इत्यादी सर्व लीक होऊ शकते. या स्पायवेअर वा त्याच्या डेव्हलपरचे नाव उघड करण्यास तज्ज्ञांनी नकार दर्शवला आहे. कारण त्यामुळे विकृत मनोवृत्तीच्या लोकांचे फावण्याची शक्यता आहे. स्पायवेअर फोनमध्ये कसा शिरू शकतोस्पायवेअर स्टॉकरवेअर ॲप्सच्या माध्यमातून फोनमधून शिरू शकतात. स्टॉकरवेअर हे नेहमीच खोट्या वा बनावट ॲपच्या नावाने दिसतात. स्टॉकरवेअरमधील हे ॲप डाऊनलोड केल्यानंतर त्यातील स्पायवेअर आपोआप स्मार्टफोनमध्ये शिरतात. काळजी काय घ्यावी?गुगलने अलीकडेच त्यांच्या प्लेस्टोअरवरून स्टॉकरवेअर ॲप्स हटवले असल्याचे स्पष्ट केले आहे. संशयास्पद वाटणारे ॲप्स डाऊनलोड न केलेलेच बरे. कोणत्याही जाहिरातींना न भुलता अधिकृत स्रोतांकडून आलेल्या जाहिरातींनाच प्रतिसाद द्यावा. २०२० मध्ये जगभरातील ५३,८७० मोबाइल युझर्सना स्टॉकरवेअरचा सामना करावा लागला होता. अनेकजण आपल्या निकटवर्तीयावर नजर ठेवण्यासाठी मुद्दाम त्याच्या स्मार्टफोनमध्ये असे स्पायवेअर घुसवत असतात, असे एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये ६७,५०० मोबाइल युझर्समध्ये हे बनावट ॲप्स आढळून आले.  आपल्या फोनमधील डेटा सुरक्षित रहावा यासाठी कायमच दक्ष राहणे गरजेचे आहे. लोकांनी त्यासाठी वरचेवर आपला स्मार्टफोन अपडेट करत रहावे असा सल्ला आहे.