शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चिनी कंपन्यांना झटका! स्वदेशी मायक्रोमॅक्स लवकरच सादर करणार लो बजेट स्मार्टफोन 

By सिद्धेश जाधव | Updated: April 18, 2022 19:35 IST

Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.

Micromax आपल्या लो बजेट स्मार्टफोन काम करत आहे, अशी बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. हा फोन लो बजेट सेगमेंटमध्ये Micromax In 2c नावाने भारतात लाँच केला जाईल, असं देखील सांगण्यात आलं होतं. आता अजून एका लीकमधून या स्वदेशी स्मार्टफोनच्या लाँचची माहिती समोर आली आहे. तसेच चिपसेटच्या कंपनीचं नाव देखील लीक झालं आहे.  

Micromax In 2c स्मार्टफोन भारतात एप्रिलच्या शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला सादर करण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यात UNISOC चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनच्या स्पेसिफिकेशन्सची किंवा किंमतीची माहिती मात्र समोर आली नाही.  

जुन्या Micromax IN Note 2 चे स्पेसिफिकेशन्स  

Micromax IN Note 2 स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या पंच होल डिस्प्लेला Corning Gorilla Glass ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन स्टॉक Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. प्रोसेसिंगसाठी मायक्रोमॅक्सच्या या फोनमध्ये मीडियाटेकचा ऑक्टा-कोर Helio G95 प्रोसेसर मिळतो. सोबत 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे.  

मायक्रोमॅक्स इन नोट 2 स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 5MP ची अल्ट्रा-वाईड अँगल, 2MP मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर मिळतो.  

कनेक्टिव्हिटीसाठी या मायक्रोमॅक्स फोनमध्ये टाईप-सी पोर्ट, ड्युअल सिम, 4G, वीओएलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस देण्यात आलं आहे. सिक्योरिटीसाठी यात साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. IN Note 2 स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 30W फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते.   

 
टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइल