शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफची लिस्टिंग

By शेखर पाटील | Updated: March 27, 2018 14:43 IST

मायक्रोमॅक्स कंपनीने आपल्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनला ग्राहकांसाठी सादर करण्याचे संकेत दिले असून याची लिस्टींगदेखील करण्यात आली आहे.

मायक्रोमॅक्स कंपनी लवकरच नवीन स्मार्टफोन सादर करणार असल्याची चर्चा कधीपासूनच सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर, फ्लिपकार्ट या शॉपिंग पोर्टलवर मायक्रोमॅक्सच्या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनची लिस्टिंग करण्यात आली आहे. यात फिचर्स तसेच मूल्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,४९० रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. अर्थात मायक्रोमॅक्सने पुन्हा एकदा १० हजार रूपयांच्या आतील किंमतपट्टयावर लक्ष केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, फ्लिपकार्टवरील लिस्टिंगनुसार या कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ या स्मार्टफोनमध्ये १८:९ गुणोत्तर असणारा डिस्प्ले असेल. अर्थात या प्रकारातील डिस्प्ले असणारा हा मायक्रोमॅक्सचा तिसरा स्मार्टफोन ठरला आहे. हा डिस्प्ले ५.४५ इंच आकारमानाचा व एचडी प्लस (२२८० बाय १०८० पिक्सल्स) क्षमतेचा असून यावर २.५ डी ग्लासचे आवरण असेल. यात क्वाड-कोअर मीडियाटेक एमटी ६७३७ प्रोसेसर देण्यात आला आहे. याची रॅम २ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एएसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा देण्यात आली आहे. यातील मुख्य कॅमेरा हा सोनी आयएमएक्स १३५ सेन्सर, एफ/२.० अपार्चर आणि एलईडी फ्लॅश या फिचर्सने सज्ज असून तो १३ मेगापिक्सल्स क्षमतेचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/२.० अपार्चर आणि ८४ अंशाचा व्ह्यू अँगल असणारा ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे.

मायक्रोमॅक्स कॅनव्हास इन्फीनिटी लाईफ हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या ७.१ नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यात २,५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल