शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

फक्त 7,999 मध्ये 5,000mAh बॅटरी आणि 6GB रॅम असलेला Micromax In 2B लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Updated: July 30, 2021 14:24 IST

Micromax In 2B India Price: मायक्रोमॅक्सने Micromax In 2B सोबत Airfunk 1 Pro आणि Airfunk 1 असे दोन वायरलेस इयरबड्स लाँच केले आहेत.

Micromax च्या नवीन स्मार्टफोनच्या बातम्या गेले काही दिवस येत होत्या. त्यानुसार या भारतीय कंपनीने आपला नवीन मोबाईल फोन Micromax In 2B लाँच केला आहे. हा स्मार्टफोन “नो हँग” फोन अश्या टॅगलाईनसह बाजारात सादर करण्यात आला आहे. मायक्रोमॅक्सने Micromax In 2B स्मार्टफोनची किंमत देखील किफायतशीर ठेवली आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपयांपासून सुरु होत आहे. या लो बजेट स्मार्टफोनसह कंपनीने Airfunk 1 Pro आणि Airfunk 1 असे दोन इयरबड्स देखील लाँच केले आहेत.  (Micromax In 2B and Airfunk Wireless Earbuds launched in India Price Specs Sale offer)

Micromax In 2B चे स्पेसिफिकेशन्स 

मायक्रोमॅक्स इन 2बी मध्ये तिन्ही बाजूंनी बेजल लेस असलेला वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले मिळतो. हा एक 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 400निट्स ब्राइटनेस देतो. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 2 ARM Cortex A75 CPU असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह Unisoc T610 चिपसेट आणि अँड्रॉइड 11 ओएस देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये जी52 जीपीयू मिळतो.  

Micromax In 2B च्या बॅक पॅनलवर ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सरसह एक 2 मेगापिक्सलची सेकंडरी एआय लेन्स कंपनीने दिली आहे. या मायक्रोमॅक्स फोनमध्ये 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. Micromax In 2B मध्ये रियर फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर देखील मिळते. या मायक्रोमॅक्स स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी आहे.  

Micromax In 2B ची किंमत 

Micromax In 2B स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा 4GB + 64GB व्हेरिएंट 7,999 रुपयांमध्ये आणि 6GB + 64GB व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा स्मार्टफोन 6 ऑगस्टपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Airfunk Wireless Earbuds 

मायक्रोमॅक्सने Micromax In 2B सोबत Airfunk 1 Pro आणि Airfunk 1 असे दोन वायरलेस इयरबड्स लाँच केले आहेत. यातील Airfunk 1 Pro ची किंमत 2499 रुपये आणि Airfunk 1 ची किंमत 1299 रुपये आहे. हे बड्स 18 ऑगस्टपासून Flipkart आणि कंपनीच्या साइटवर विकत घेता येतील.  

टॅग्स :Micromaxमायक्रोमॅक्सSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड