शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

22 जूनला लाँच होईल भारतातील सर्वात हलका आणि स्लिम फोन Mi 11 Lite; किंमत देखील आली समोर 

By सिद्धेश जाधव | Updated: June 9, 2021 15:40 IST

Mi 11 Lite Launch: मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला  भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल. 

Xiaomi ने यावर्षी मार्चमध्ये चीनमध्ये Mi 11 Lite 4G आणि 5G व्हर्जनमध्ये लाँच केला होता. आता कंपनीना हा फोन भारतात लाँच करण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसांपूर्वी टीज केल्यानंतर आता कंपनीने सांगितले आहे कि, 22 जूनला भारतात मी 11 लाइट लाँच केला जाईल. हा फोन भारतातील सर्वात स्लिम आणि हलका फोन असेल, असा कंपनीने दावा केला आहे. (Mi 11 Lite will launch in India on June 22 company confirmed date) 

मी इंडियाने ऑफिशियल ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली आहे कि, कंपनी 22 जूनला  भारतातील सर्वात हलका आणि सर्वात स्लिम फोन मी 11 लाइट सादर करेल. विशेष म्हणजे, प्रसिद्ध टिप्स्टर ईशान अग्रवालने यावर्षीच्या सुरुवातीलाच सांगितले होते कि, एमआय 11 लाइट भारतात 3 व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. इंडिया टुडेने अलीकडेच एका रिपोर्टमध्ये सांगितले होते कि Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंटची किंमत भारतात 25000 रुपयांच्या आसपास असेल.  

Xiaomi Mi 11 Lite स्पेसिफिकेशन्स  

Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनचे दोन्ही 4G आणि 5G व्हेरिएंट्स 6.5-इंचाच्या FHD+ AMOLED पॅनलसह सादर केले गेले आहेत. या स्मार्टफोनच्या 4G व्हेरिएंट्सच्या डिस्प्लेमध्ये कंपनीने Corning Gorilla Glass 5 आणि 5G व्हेरिएंटमध्ये Gorilla Glass 6 ची सुरक्षा दिली आहे. दोन्ही स्मार्टफोनमध्ये कंपनीने 4,200mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्ज सपोर्टसह येते.  

शाओमीच्या दोन्ही स्मार्टफोनमध्ये एकसारखा रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा मुख्य कॅमेरा 64MP सेंसर आहे. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 5MP मॅक्रो सेंसर देण्यात आला आहे. Xiaomi Mi 11 Lite स्मार्टफोनच्या फ्रंटला 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. कंपनीने Xiaomi Mi 11 Lite 5G व्हेरिएंट्समध्ये 20MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे.  

Xiaomi Mi 11 Lite 4G व्हेरिएंट्स कंपनीने Qualcomm Snapdragon 732G चिपसेटसह सादर केला आहे. तर, Xiaomi Mi 11 Lite 5G स्मार्टफोन कंपनीने Snapdragon 780G चिपसेटसह सादर केला आहे. दोन्ही स्मार्टफोन 8GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केले गेले आहेत. AMOLED पॅनलसह शाओमीच्या या दोन्ही व्हेरिएंट्समध्ये कंपनीने साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. 

टॅग्स :xiaomiशाओमीtechnologyतंत्रज्ञानSmartphoneस्मार्टफोन