शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मेझू प्रो ७ स्मार्टफोनची लिस्टींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 15:38 IST

मेझू प्रो ७ आणि मेझू प्रो ७ प्लस लवकरच बाजारात

मेझू या कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी आपला मेझू प्रो ७ हा स्मार्टफोन सादर करण्याचे संकेत दिले असून याची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवर लिस्टींग करण्यात आली आहे.मेझू कंपनीने गेल्या वर्षी चीनमध्ये मेझू प्रो ७ आणि मेझू प्रो ७ प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते. या दोन्ही मॉडेल्समध्ये ड्युअल डिस्प्ले हे विशेष फिचर देण्यात आले होते. यातील मेझू प्रो ७ हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्यात येत असल्याचे संकेत मिळाले आहेत. या स्मार्टफोनची अमेझॉन इंडिया या शॉपींग पोर्टलवरून लिस्टींग करण्यात आली आहे. यानुसार हे मॉडेल ग्राहकांना २२,९९९ रूपये मूल्यात खरेदी करता येणार आहे. तथापि, याच्या उपलब्धतेबाबत अद्याप या लिस्टींगमध्ये माहिती देण्यात आलेली नाही.मेझू ७ प्रो या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी म्हणजेच १९२० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा मुख्य डिस्प्ले असेल. तर याच्या मागच्या बाजूस १.९ इंच आकारमानाचा आणि २४० बाय ५३५ पिक्सल्स क्षमतेचा दुसरा डिस्प्ले दिलेला असेल. म्हणजेच या स्मार्टफोनच्या दोन्ही बाजूंनी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याच्या मागील बाजूस असणारा डिस्प्ले हा आकाराने लहान असला तरी यावर संबंधीत युजर विविध नोटिफिकेशन्स, वेदर अलर्ट आदींना पाहू शकतो. विशेष बाब म्हणजे यामुळे रिअर कॅमेर्‍याच्या मदतीने सेल्फी प्रतिमा काढणे सोपे होणार आहे. मीडियाटेक ऑक्टा-कोअर हेलिओ पी २५ या प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या मॉडेलमध्ये चार जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोअरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. मेझू ७ प्रो या मॉडेलमध्ये एफ/२.० अपार्चर, एलईडी फ्लॅश आणि पीडीएएफ या फिचर्सनी सज्ज असणारे १२ मेगापिक्सल्सचे दोन मुख्य कॅमेरे असतील. यातील एक कॅमेरा आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असून दोन्हीच्या माध्यमातून अतिशय उत्तम दर्जाचे छायाचित्र घेता येत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ/२.० अपार्चरसह १६ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एमचार्ज या फास्ट चार्जींगच्या फिचरसह यातील बॅटरी ३,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. 

टॅग्स :Mobileमोबाइल