शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

झूमवर मेल, कॅलेंडरही पाहता येणार! लोकांमधील अंतर कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 09:45 IST

कोरोनामध्ये मिटींग घेण्यास सर्वात सुलभ ठरलेल्या ‘झूम’ने आता आणखी नवीन फिचर्स सादर केली आहेत.

नवी दिल्ली :

कोरोनामध्ये मिटींग घेण्यास सर्वात सुलभ ठरलेल्या ‘झूम’ने आता आणखी नवीन फिचर्स सादर केली आहेत. ‘झूम’च्या वापरकर्त्यांना लवकरच मिटींगमध्येही मेल आणि कॅलेंडर पाहता येणार आहे. याबाबतची घोषणा ‘झूम’ने त्यांच्या वार्षिक झूमटोपिया इव्हेंटमध्ये केली आहे.

‘झूम’ने यंदाच्या वर्षात १,५००हून अधिक वैशिष्ट्ये आणि सुधारणा केल्याचा दावा केला आहे. ‘झूम’चा स्वतःचा मेल आणि कॅलेंडरच्या फिचर्समुळे वापरकर्त्यांना झूमवर अधिक काम करणे शक्य होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ‘झूम’चे मेल आणि कॅलेंडर ॲप्स वापरण्यासाठी  झूम वापरकर्त्यांना त्यांचे ई-मेल तपासण्यासाठी झूम प्लॅटफॉर्म सोडण्याची गरज नाही. ही सेवा सध्या बीटामध्ये तसेच अमेरिका आणि कॅनडामध्ये उपलब्ध आहे.

झूम मेलसाठी ई-मेलमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन असेल. झूम कॅलेंडर दरम्यान ॲपमध्ये झूम व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल शेड्यूल करण्यास परवानगी देईल, असे कंपनीने सांगितले.

१,५००+ वैशिष्ट्ये, सुधारणा यंदाच्या वर्षात केल्या आहेत.झूम स्पॉट्स काय आहे? -२०२३मध्ये येणारी झूम स्पॉट्स ही एक व्हर्च्युअल को-वर्किंग स्पेस आहे, जी अधिक वैयक्तिक काम करण्यासाठी तयार केली आहे.  - सध्या यातील बरेच तपशील कंपनीने सादर केले नसले तरीही हे स्पष्ट आहे की, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या लोकांमधील अंतर कमी करणे हे कंपनीचे लक्ष्य आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान