शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम 1 ची लिस्टींग

By शेखर पाटील | Updated: November 30, 2017 11:24 IST

असुस कंपनीने झेनफोन मॅक्स प्लस एम१ हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली आहे.

काही स्मार्टफोन उत्पादक आपापल्या आगामी मॉडेल्सची अधिकृत लाँचिंगच्या आधी आपल्या संकेतस्थळावर लिस्टिंग करत असतात. या अनुषंगाने असुस कंपनीने आपल्या रशियन संकेतस्थळावर असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम१ या मॉडेलची लिस्टींग केली आहे. अर्थात हा स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारपेठेत उतारण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लिस्टिंगमध्ये संबंधित स्मार्टफोनचे मूल्य नमूद केलेले नसले तरी याचे सर्व फीचर्स जाहीर करण्यात आले आहेत.

या लिस्टिंगनुसार असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम 1 या मॉडेलमध्ये ५.७ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा २.५ डी या प्रकारातील आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा अस्पेक्ट रेशो १८:९ असा आहे. यात मीडियाटेक एमटी६७५० टी हा प्रोसेसर असेल. याचे २ जीबी रॅम/१६ जीबी स्टोअरेज आणि ३जीबी रॅम/३२ जीबी स्टोअरेज असे दोन व्हेरियंट सादर करण्यात येणार आहेत. दोन्ही व्हेरियंटमध्ये मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविण्याची व्यवस्था असेल.

यात ड्युअल कॅमेरा सेटअप असेल. याच्या मागील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे असतील. यात एलईडी फ्लॅश आणि ऑटो-फोकसची सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा फुल एचडी क्षमतेचे व्हिडीओ चित्रीकरण करू शकेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात ८ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा असेल. हा स्मार्टफोन अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारा असून यावर कंपनीचा झेन युआय ४.० प्रदान करण्यात आला आहे. यात तब्बल ४०३० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलीली आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल