शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

फक्त 1,399 रुपयांमध्ये Lava Pro Buds 2 इयरबड्स भारतात लाँच; कम किंमतीत मिळणार पावरफुल साउंड 

By सिद्धेश जाधव | Updated: August 23, 2021 18:29 IST

Lava Pro Buds 2 Price: Lava Pro Buds 2 इयरबड्समध्ये 14 mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आले आहेत, जे पावरफुल साउंड आणि थंपिंग बेस देतात.

ठळक मुद्देLava Pro Buds 2 मध्ये कंपनीने टच तसेच व्हॉईस असिस्टंट फीचर देखील दिले आहेत. Lava Pro Buds 2 ची किंमत कंपनीने 1,699 रुपये ठेवली आहे. प

Lava ने भारतात आपले नवीन इयरबड्स Pro Buds 2 लाँच केले आहेत. हे बड्स सिंगल चार्जमध 23 तासांचा बॅटरी बॅकअप देतात, असा दावा कंपनीने केला आहे. यातील IPX5 रेटिंगमुळे हे बड्स व्यायाम करताना देखील वापरता येतील. चांगल्या साउंड क्वालिटीसाठी कंपनीने Pro Buds 2 मध्ये 14mm च्या ड्रायव्हरचा वापर केला आहे.  

Lava Pro Buds 2 चे स्पेसिफिकेशन्स 

Lava Pro Buds 2 इयरबड्समध्ये 14 mm डायनॅमिक ड्रायव्हर देण्यात आले आहेत, जे पावरफुल साउंड आणि थंपिंग बेस देतात. या इयरबड्समधील इन्स्टंट ‘Wake And Pair Technology’ मुळे चार्जिंग केस उघडताच हे स्मार्टफोनशी कनेक्ट होतात. या लावा इयरबड्समध्ये कनेक्टिविटीसाठी Bluetooth v5.0 देण्यात आली आहे.  हे देखील वाचा: स्वस्त 5G स्मार्टफोन झाला अजून स्वस्त; Realme Narzo 30 5G चा छोटा व्हेरिएंट बाजारात लाँच

Lava Pro Buds 2 मध्ये कंपनीने टच तसेच व्हॉईस असिस्टंट फीचर देखील दिले आहेत. उजव्या इयरबड्सवर दोनदा टॅप करून व्हॉईस असिस्टंट फीचर वापरता येईल. सिंगल चार्जमध्ये Pro Buds 2 चार्जिंग केससह 23 तासांचा बॅकअप देतात. तर इयरबड्स 5 तास प्ले बॅक टाइम ऑफर करतात. चार्जिंग केसमध्ये 370 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. Lava Pro Buds 2 इयरबड्समध्ये IPX5 रेटिंग देण्यात आली आहे, त्यामुळे घाम आणि पाण्याच्या थेंबांपासून यांचे संरक्षण होते. हे देखील वाचा: 15,600mAh क्षमता असलेल्या अवाढव्य बॅटरीसह ‘हा’ 5G स्मार्टफोन लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळणार 6 दिवसांचा बॅकअप

Lava Pro Buds 2 ची किंमत 

Lava Pro Buds 2 ची किंमत कंपनीने 1,699 रुपये ठेवली आहे. परंतु लाँच ऑफर अंतर्गत हे बड्स 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येतील. Pro Buds 2 भारतात 26 ऑगस्टपासून Lava E-store, Amazon आणि Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध होतील.  

टॅग्स :lavaलावा