शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

सावधान! ऑनलाईन फ्रॉडच्या जाळ्यात अडकलात?, सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार; वेळीच व्हा सतर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 16:32 IST

Cyber Crime News : तुम्हाला आता गरज वाटत नसेल, परंतू पुढे लागू शकते. कदाचित भाऊ, मित्र, बहीण, मैत्रिण, नातेवाईक, शेजारी यांना याबाबत कधीही ही माहिती लागू शकते. 

नवी दिल्ली - सोशल मीडियाचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र हल्ली यामुळे होणाऱ्या फ्रॉडची संख्या देखील वाढली आहे. विविध मार्गांचा वापर करून हॅकर्स युजर्सना आपल्या जाळ्यात ओढत आहेत. अनेक जण ऑनलाईन फ्रॉडचे शिकार होत आहेत. खासगी डेटा चोरी झाल्यास नेमकं काय करावं हे अनेकांना माहीत नाही. ऑनलाइन शॉपिंग किंवा डिजिटल पेमेंट करताना अनेकदा लोकांची फसवणूक केली जाते. सायबर क्राइमकडे याबाबत कशी तक्रार करायची ते जाणून घेऊया. तुम्हाला आता गरज वाटत नसेल, परंतू पुढे लागू शकते. कदाचित भाऊ, बहीण, मित्र-मैत्रिण, नातेवाईक, शेजारी यांना याबाबत कधीही ही माहिती लागू शकते. 

सायबर क्राइमकडे 'अशी' करा तक्रार

- सायबर क्राइमची एखादी तक्रार करण्यासाठी तयार करण्यात आलेलं हे पोर्टल देशातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं. यात तक्रार केल्यानंतर ठाण्याच्या फेऱ्या माराव्या लागत नाही. यात ऑनलाइन तक्रार नोंदवता येते. याची सर्व माहिती ऑनलाइन मिळते. 

- आपली ओळख पण गुप्त ठेवली जाते. जर सायबर क्राइम (Cyber Crime) झाला तर तुम्ही सर्वात आधी राष्ट्रीय सायबर गुन्ह्याकडे रिपोर्ट करा. अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार करा. ही वेबसाईट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. या वेबसाईटवर जाण्यासाठी cybercrime.gov.in वर क्लिक करा.

- वेबसाईटवर पोर्टलशी संबंधीत विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा. तसेच या वेबसाईटमध्ये रिपोर्ट सायबर क्राइम रिलेटेड टू महिला-लहान मुले आणि रिपोर्टमध्ये सायबर क्राइमचे दोन भाग केलेले असतात. 

- युजर्सला कशात तक्रार करायची आहे. त्यावर क्लिक करा. सायबर क्राइम अंतर्गत धोका, फिशिंग, हॅकिंग, आणि फ्रॉड यासारखे मुद्दे येतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, नावासह सर्व माहिती विचारली जाईल.

- सायबर क्राइम रिलेटेड महिला-लहान मुलांपासून ऑनलाईन बुकिंग, पोर्नोग्राफी आणि सेक्सुअली एक्सप्लिस्ट येतात. यात जो विषय असेल त्यात तक्रार करा. तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. 

- तुम्ही कोणत्या कॅटेगरीत तक्रार करता. आरोपीचे नाव, ठिकाण आणि पुरावा मागितला जातो. सर्व आवश्यक माहितीची नोंद केल्यानंतर तक्रार सबमिट करता येऊ शकते. ज्यावेळी तुम्ही सायबर क्राइम रिपोर्ट करता त्यानंतर तुम्हाल तक्रार आयडी दिला जातो. तो एक युनिक नंबर असतो. 

- जर तुम्हाला या तक्रारीचा फॉलोअप या नंबरवरून घेतला जातो. तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा स्टेट्स जाणून घेण्यासाठी त्याला ट्रॅक करावे लागते. अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉगइन करा. 

- लॉगिन झाल्यानंतर रिपोर्ट अँड ट्रॅकवर क्लिक करा. यानंतर युजर्सना एक युनिक नंबर मिळतो. तसेच यावर सर्व आवश्यक माहिती मिळते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका; केंद्र सरकारने जारी केले 7 फ्री टूल्स

Google Chrome ला खतरनाक व्हायरसचा धोका असल्याची माहिती आता समोर आली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) भारतीय युजर्स संगणक, स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणांना नवीन व्हायरस बॉटनेटच्या अटॅकपासून बचाव करण्यासाठी 7 नवीन फ्री टूल्स दिली आहेत. MeitY ने हे पाऊल सायबर क्लीन सेंटर (बॉटनेट क्लीनिंग अँड मालवेअर अ‍ॅनालिसिस सेंटर) म्हणून उचललं आहे. इंडियन कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) मार्फत हे टूल्स क्विक हील आणि ईस्कॅन सारख्या पार्टनर्ससोबत ऑपरेट केले जात आहेत. बॉटनेट्स हा इन्फेक्टटेड डिव्हाईसचा एक गट आहे जो हानिकारक काम करण्यासाठी एकत्रित काम करतो. हे डिव्हाईस हॅकर्सद्वारे नियंत्रित केले जातात. याच दरम्यान युजर्सना स्पॅम पाठवले जात आहेत. डेटा चोरी केला जात आहे. अनऑथोराइज्ड अ‍ॅक्सेस आहे ज्याद्वारे डीडीएसएसवर अटॅक केला जात आहे.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलfraudधोकेबाजी