शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

जंबो बॅटरीने सज्ज मोटो ई ४ प्लस

By शेखर पाटील | Updated: July 25, 2017 16:35 IST

मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.

मोटोरोला कंपनीने भारतात तब्बल ५,००० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असणारा मोटो ई ४ प्लस हा स्मार्टफोन लाँच केला असून ग्राहकांना हे मॉडेल फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे.अलीकडे बहुतांश स्मार्टफोनमध्ये बॅटरी हा अत्यंत महत्वाचा घटक असल्याचे दिसून येत आहेत. बहुतांश कंपन्या उत्तमोत्तम बॅटरीने सज्ज असणारे मॉडेल लाँच करत आहेत. या पार्श्‍वभूमिवर लेनोव्होची मालकी असणार्‍या मोटोरोला मोबिलिटी या कंपनीने मोटो ई ४ प्लस हे मॉडेल भारतीय ग्राहकांना आज दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात सादर करण्यात आले. वर नमूद केल्यानुसार याची खासियत म्हणजे यातील तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल. यात रॅपीड चार्जरची सुविधादेखील असेल.  यात मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असेल. अर्थात यावर रिलायन्स जिओसह अन्य व्हिओएलटीई सेवांना वापरता येईल. उर्वरित कनेक्टीव्हिटीत ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश असेल.मोटो ई ४ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ ग्लास वक्राकार डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसरने सज्ज असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना फ्लिपकार्टवरून ९,९९९ रूपये मुल्यात खरेदी करता येणार आहे. मोटो ई ४ प्लस सोबत कंपनीने काही ऑफर दिल्या आहेत. यात प्रामुख्याने हॉटस्टार या अ‍ॅपच्या दोन महिन्याच्या मोफत सबस्क्रिप्शनसह जिओ व आयडियाने मोफत फोर-जी डेटा देण्याची घोषणा आहे. तर मोटो पल्स २ हा हेडफोन या स्मार्टफोनसोबत सवलतीच्या दरात मिळेल.