JIO OTT Subscription: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्स Jio आपल्या ग्राहकांसाठी सातत्याने नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येते. कंपनीने सुरुवातीपासूनच कमी किमतीत अधिकाधिक फायदे देण्यावर भर दिला आहे. Jio कडे असे अनेक रिचार्ज प्लॅन्स आहेत, ज्यात अनलिमिटेड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत SMS आणि OTT सबस्क्रिप्शनसारख्या सुविधा मिळतात. आता आम्ही तुम्हाला Jio च्या अशाच काही प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात Amazon Prime आणि Jio Cinema सारखे OTT मिळतात.
जिओचा प्लॅन 84 दिवसांचा प्लॅनजिओचा 1,029 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळतात. यामध्ये तुम्हाला एकूण 168 जीबी डेटा मिळतो. तुम्ही दररोज 2 GB हायस्पीड डेटा वापरू शकता. याशिवाय, अमर्यादित कॉलिंगसह दररोज 100 एसएमएस मिळतात. मनोरंजनासाठी, Amazon Prime Lite, Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे मोफत सबस्क्रिप्शन मिळते.
72 दिवसांचा प्लॅनजिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला 72 दिवसांची वैधता मिळते. यात तुम्हाला एकूण 164 GB डेटा ऑफर केला जातो. दररोज हाय स्पीड 2 GB डेटा + 20 GB वापरण्याची संधी मिळते. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसदेखील मिळतात. या प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील दिले जाते.