शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

BSNL च्या स्वस्त प्लॅनसमोर Jio-Airtel फेल; वर्षभर रिचार्जचे टेन्शन नाही, भरपूर डेटाही मिळेल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 18:53 IST

BSNL ने एक वर्षांची व्हॅलिडिटी असलेला स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.

BSNL : खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यापासून BSNL ला सुगीचे दिवस आले आहेत. लाखो ग्राहक बीएसएनएलकडे वळत आहेत, त्यामुळेच आता सरकारकडून टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्याचे काम जोरात सुरू आहे. बीएसएनएलचा नवीन लोगो आणि स्लोगन मंगळवारी( 22 ऑक्टोबर) जारी करण्यात आला आहे. याशिवाय 7 नवीन सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. 

BSNL च्या 4G आणि 5G सेवेसाठी 1 लाख नवीन मोबाईल टॉवर बसवले जात आहेत. एवढेच नाही, तर कंपनीने आपल्या लाखो यूजर्सना खुश करण्यासाठी भविष्यात रिचार्ज प्लॅन महाग केले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

BSNL आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅन्समुळे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. या सरकारी टेलिकॉम कंपनीचा असाच एक स्वस्त प्लॅन आहे, ज्यासाठी यूजरला संपूर्ण महिन्यात 140 रुपयांपेक्षा कमी खर्च करावा लागतो. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे. म्हणजेच संपूर्ण 1 वर्षासाठी रिचार्जचे कोणतेही टेंशन असणार नाही. याव्यतिरिक्त, या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना अमर्यादित कॉलिंग, मोफत नॅशनल रोमिंग, मोफत एसएमएस आणि इंटरनेट डेटा यासारखे फायदे देखील मिळतात.

365 दिवसांचा स्वस्त प्लॅनभारत संचार निगम लिमिटेडचा हा रिचार्ज प्लॅन 1,499 रुपयांचा आहे. या प्लॅनची ​​वैधता 365 दिवसांची आहे आणि यामध्ये युजर्सना भारतातील कोणत्याही नेटवर्कवर मोफत कॉलिंगचा लाभ मिळतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये, दररोज 100 मोफत एसएमएस आणि एकूण 24GB हाय स्पीड डेटाचा लाभ मिळतो. 

बीएसएनएलचा हा प्लॅन खासकरून अशा यूजर्ससाठी आहे, जे जास्त डेटा वापरत नाहीत आणि फक्त कॉलिंगसाठी त्यांचा नंबर सुरू ठेवू इच्छितात. विशेष म्हणजे, खाजगी कंपन्या Airtel, Jio आणि Vi चा सर्वात स्वस्त 1 वर्षाचा प्लॅन 1,899 रुपयांपेक्षा कमीत मिळत नाही. 

टॅग्स :BSNLबीएसएनएलAirtelएअरटेलJioजिओSmartphoneस्मार्टफोन