शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वर्ष झाले, एअरटेल, जिओ 5G ची मजल कुठपर्यंत गेली? महागडी रिचार्ज आणणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2023 14:24 IST

Airtel, Jio 5G Coverage: लवकरच कंपन्या ५जी साठी वेगळे पॅक किंवा रिचार्ज महाग करण्याची शक्यता आहे. असे असले तरी गावा गावात अद्याप फाईव्ह जीची सेवा पोहोचलेली नाहीय.

देशात फाईव्ह जी सेवा सुरु होऊन आता एक वर्ष झाले आहे. एअरटेलने सर्वात आधी 5G सेवा लाँच करत जिओला मागे टाकले होते. तसेच दोन्ही कंपन्यांनी सुरुवातीला ४जी च्या पॅकमध्येच ५जी सेवा देण्यास सुरुवात केली होती. सुमारे वर्षभर ही सेवा ४जी च्या पॅकवरच मिळेल म्हणजेच मोफत मिळेल असे सांगितले जात होते. परंतू, आजही ही सेवा ट्रायलच्या नावाखाली मोफत दिली जात आहे. 

लवकरच कंपन्या ५जी साठी वेगळे पॅक किंवा रिचार्ज महाग करण्याची शक्यता आहे. असे असले तरी गावा गावात अद्याप फाईव्ह जीची सेवा पोहोचलेली नाहीय. भारतात सर्वात आधी ५जी सेवा लाँच करणाऱ्या एअरटेलची मजल कुठपर्यंत गेलीय? जिल्हा पातळीवर आहे की तालुका पातळीवर? 

या काळात एअरटेलने 50 दशलक्षाहून अधिक ५ जी ग्राहक जोडले आहेत. तसेच देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये एअरटेल फाईव्ह जीचे नेटवर्क मिळू लागले आहे.  छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग आणि VSAT द्वारे जोडलेले लक्षद्वीप बेट याठिकाणी फक्त ही सेवा उपलब्ध नाहीय. 

जिओची देखील तालुका पातळीवर फाईव्ह जी सेवा सुरु झाली आहे. अद्याप तालुक्यांतील छोटी छोटी शहरे, गाव, बाजारपेठा आदी ठिकाणी फाईव्ह जी सेवा मिळत नाहीय. म्हणजेच दोन्ही कंपन्यांना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. 

जिओ, एअरटेलने किती शहरांत सेवा सुरु केलीय? Jio आणि Airtel आज एकत्रितपणे 10,000 शहरांना त्यांच्या ‘True 5G’ आणि ‘5G Plus’ नेटवर्कसह सेवा देण्यास सुरुवात केली आहे. अद्याप छोटी शहरे, गावे फाईव्ह जी नेटवर्कच्या परिघात येणे बाकी आहे. कदाचित ही शहरे, गावे व्यापल्यानंतर या दोन्ही कंपन्या फाईव्ह जी रिचार्ज लाँच करण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :AirtelएअरटेलJioजिओ