शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा  

By सिद्धेश जाधव | Updated: September 22, 2021 18:16 IST

Low Budget Smartphone Itel A26 Price: itel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्‍टेट्स सेव सारखे फंक्शन्स वापरता येतील.

ठळक मुद्देitel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. आयटेल ए26 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, त्यामुळे कंपनीने यात अँड्रॉइडच्या गो एडिशनचा वापर केला आहे. हा डिवाइस 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे.

चिनी कंपनी आयटेलने पुन्हा एकदा 6,000 रुपयांच्या आत एक नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. याआधी देखील कंपनीने या एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये आपला दबदबा दाखवून दिला होता आणि त्याची दखल रिसर्च फर्म काउंटरपॉईंटने देखील घेतली होती. आता आयटेल आपल्या ‘ए’ नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने itel A26 स्मार्टफोन फक्त 5,999 रुपयांमध्ये सादर केला आहे.  

itel A26 स्मार्टफोनमध्ये कंपनीने खास सोशल टर्बो फिचर दिला आहे. याच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्डिंग, पीक मोड, कॉल अलर्ट आणि स्‍टेट्स सेव सारखे फंक्शन्स वापरता येतील. हा स्मार्टफोन विकत घेतल्यानंतर 100 दिवसांच्या आत स्क्रीन तुटल्यास, ती एकदा मोफत बदलून दिली जाईल. हा डिवाइस ग्रीन, लाईट पर्पल आणि डीप ब्‍लू अशा तीन ग्रेडियंट कलर्समध्ये उपलब्‍ध होईल.   

itel A26 चे स्पेसिफिकेशन्स 

आयटेल ए26 हा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे, त्यामुळे कंपनीने यात अँड्रॉइडच्या गो एडिशनचा वापर केला आहे. हा फोन 1.4गीगाहर्ट्ज स्पीड असलेल्या क्वॉड-कोर Unisoc SC9832e प्रोसेसरवर चालतो. यात वॉटरड्रॉप नॉचसह 5.7 इंचाचा एचडी प्‍लस आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा आस्‍पेक्‍ट रेश्‍यो 19:9 इतका आहे.  

हा डिवाइस 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेजसह बाजारात आला आहे. हा फोन 128GB पर्यंतच्या मायक्रोएसडी कार्डला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फिचरला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे, तसेच यात डेडिकेटेड मेमरी कार्ड स्लॉट देखील मिळतो.  

फोटोग्राफीसाठी itel A26 च्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 5 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि एक एआय प्‍लस वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या आयटेल फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. ए26 मध्ये 3020एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड