शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या फोनचं Bluetooth नेहमी ऑन असतं? कॉलवरचं तुमचं संभाषण ऐकू शकतात हॅकर्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 15:26 IST

सध्या सर्वच स्मार्टफोन Bluetooth सुविधा असतेच. अनेकदा युझर्स ब्लूटूथ डिस्कवरी मोडवर सोडून देतात. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनचं ब्लूटूथ कुणीही सर्च रू शकतं.

सध्या सर्वच स्मार्टफोन Bluetooth सुविधा असतेच. अनेकदा युझर्स ब्लूटूथ डिस्कवरी मोडवर सोडून देतात. म्हणजेच तुमच्या स्मार्टफोनचं ब्लूटूथ कुणीही सर्च करू शकतं. त्यामुळे अशा गोष्टींवर हॅकर्सचं लक्ष असतंच. हॅकर्स या माध्यमातून तुमच्या डिवाइसचा डेटा अॅक्सेस करू शकतात. त्यामुळे प्रायव्हसी आणि सिक्युरिटीच्या पातळीवर ही गोष्ट जास्तच अडचणीची ठरू शकते. 

ब्लूटूथ तुम्ही ऑन ठेवलं आणि तुम्ही त्याचा उपयोग डिव्हाइस पेअरिंगसाठी करत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. यापासून बचावासाठी आधी जाणून घ्यावं लागेल की BlueBugging काय आहे की ज्यानं तुमचा मोबाइलचा कंट्रोल केला जाईल. BlueBugging सोबतच हॅकर्स Bluesnarfing आणि Bluejacking चाही वापर करुन मोबाइल यूझरचा डेटा अॅक्सेस केला जाऊ शकतो. 

काय आहे  BlueBuggingBlueBugging चा हल्ला जास्त धोकादायक मानला जातो. यात हॅकर्स यूझर्सच्या डिव्हाइसचा अॅक्सेस मिळवण्याचा प्रयत्न करतात. यासाठी ब्लूटूथ कनेक्शनची मदत घेतली जाते. कनेक्शनला अल्टर करत यूझरचा पासवर्ड आणि इतर डिटेल्स चोरी करण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी हॅकरआधी यूझरच्या मोबाइलपर्यंत पोहोचतात आणि त्यात मालवेअर इन्स्टॉल करतात. यातून भविष्यातही यूझरच्या मोबाइलचा अॅक्सेस मिळवला जाऊ शकतो. तसंच हॅकर यूझरचं फोनवरील संभाषण देखील ऐकू शकतो. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान