Gmail Storage : आपल्या सगळ्यांचेचं जीमेल अकाउंट आहेत. सध्या जीमेलवरुनच सर्व कामे केली जातात. आधार कार्डचा ओटीपी, सोशल मीडियाच्या खात्यांचा ओटीपी आपल्या जीमेल अकाउंटवर येतो. पण, सध्या अनेकांच्या जीमेल खात्यावर मेल येत नाही याचे कारण म्हणजे आपल्या जीमेलचे स्टोरेज फुल्ल झाले आहे. यासाठी जीमेल आपल्याला स्टोरेज वाढवण्यासाठी सबक्रिप्शन घेण्याची ऑफर देत. यासाठी काही प्लॅन्स आहेत. यासाठी पैसे खर्च होतात म्हणून अनेकजण सबक्रिप्शन घेत नाहीत.
Google चा इशारा, AI द्वारे २५० कोटी युजर्सचे जीमेल अकाउंट हॅक होऊ शकते, हे काम त्वरित करा
जीमेल सुरुवातील काही प्रमाणातच स्टोरेज देत असतं. त्या स्टोरेजमध्ये फोटो आणि व्हिडीओचे प्रमाण वाढले तर ते स्टोरेज फुल्ल होतं. आता स्टोरेज सबक्रिप्शन न घेताही आपल्याला स्टोरेज वाढवता येतंय. या ट्रिक्स आपण समजून घेऊया.
जीमेल अॅपमध्ये स्पॅम आणि ट्रॅश फोल्डर आहे. जर तुम्ही ते वापरले नाही तर स्टोरेज पुन्हा पुन्हा भरेल. म्हणून त्याचा वापर करणे महत्वाचे आहे. अनेकवेळा आपण काही मेल डिलीट करतो आणि आपल्याला वाटते की आता जीमेल अॅप स्टोरेज रिकामे झाले असेल. पण असं होतं नाही. उलट हे मेल ट्रॅश फोल्डरमध्ये जातात. यासाठी तुम्ही ट्रॅश फोल्डर वेळोवेळी डिलीट केला पाहिजे.
लेबल्स आणि फोल्डर ऑर्गनाइज करा
जीमेल अॅप सुपरफास्ट बनवण्यासाठी, तुम्ही लेबल्स आणि फोल्डर्स सुरू करा. आपल्याला अनेक नको असलेले मेल येत असतात. अशावेळी तुम्ही अनसब्सक्राइब करा. यामुळे तुम्हाला नको असलेले मेल येणे बंद होईल.
तुमच्या मेल मध्ये जर काही मोठ्या साईजचे मेल असतील तर ते मेल आधी डिलिट करा.
स्पॅम मेल डिलीट करा
तुमच्या लॅपटॉपवर जीमेल खाते ओपन करा. मेल ऑप्शनवर सर्च मेल वरती जावा. या ठिकाणी तुम्ही अनसबक्राइब टाइप करा. यानंतर राईट साईडला फिल्टर आयकॉनवर क्लिक करा. यानंतर स्क्रिनवर सर्वात शेवटी क्रिएट फिल्टर वर जा. यानंतर Also Apply filter to matching con वर चेक करावे लागेल. आता तुम्हाला Apply The Lable सेक्शनवर जावे लागेल. येथे तुम्हाला New Lable या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. New Lable यावर Subscribe वर टाइप करा. यानंतप तुम्हाला Subscribe नावापासून फिल्टर क्रिएट होईल.