शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आयटेल पॉवर प्रो पी४१: जंबो बॅटरी, अँड्रॉइडची नोगट आवृत्ती

By शेखर पाटील | Updated: August 12, 2017 11:20 IST

आयटेल मोबाईल या कंपनीने भारतीय ग्राहकांना जंबो बॅटरीने सज्ज असणारा पॉवर प्रो पी ४१ हा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात सादर केला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.

आयटेल मोबाईल या कंपनीने भारतीय ग्राहकांना जंबो बॅटरीने सज्ज असणारा पॉवर प्रो पी ४१ हा स्मार्टफोन अवघ्या ५,९९९ रूपये मूल्यात सादर केला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे आहे.

भारतीय स्मार्टफोनच्या बाजारपेठेत ग्राहकांना आकृष्ट करून घेण्यासाठी विविध कंपन्या नवनवीन मार्गांचा अवलंब करत आहेत. या अनुषंगाने अलीकडच्या काळात बॅटरी हा घटक अतिशय महत्वाचा बनला आहे. सध्या मल्टी-टास्कींगचे युग असल्याने युजर मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करतो. यातच जिओसह अन्य कंपन्यांनी किफायतशीर दरात फोर-जी प्लॅन्स जाहीर केल्यामुळे व्हिडीओ पाहण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे अर्थातच बॅटरीचा वापर हा महत्वाचा घटक बनला आहे. यामुळे काही कंपन्या दीर्घ काळ टिकणार्‍या बॅटर्‍यांनी सज्ज असणारे स्मार्टफोन सादर करत आहेत. यात आता आयटेल पॉवर प्रो पी४१ या मॉडेलची भर पडली आहे. यात तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी प्रदान करण्यात आली आहे. ती एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल ५१ तासांचा बॅकअप मिळत असल्याचा कंपनीचा दावा आहे. तर यातून संगीताचा तब्बल ९५ तासांपर्यंत आनंद घेता येत असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. तर हे मॉडेल अँड्रॉइडच्या ७.० अर्थात नोगट या आवृत्तीवर चालणारे असेल. 

उर्वरित फिचर्सचा विचार केला असता, आयटेल पॉवर प्रो पी४१ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि ८५४ बाय ४८० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ऑन सेल डिस्प्ले असेल. याची रॅम दोन जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज आठ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यातील मुख्य कॅमेरा ड्युअल फ्लॅश आणि ऑटो-फोकस या प्रणालींनी युक्त असून ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात २ मेगापिक्सल्सचा कॅमेरा देण्यात आला आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी कनेक्टिव्हिटीचे पर्याय देण्यात आले आहेत. आयटेल पॉवर प्रो पी४१ हे मॉडेल ग्राहकांना ग्रॅफाईट, सिल्व्हर ग्रे आणि शँपेन या तीन आकर्षक रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत.