शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात लाँच झाला iQOO Z3 5G; जाणून घ्या किंमत 

By सिद्धेश जाधव | Updated: June 8, 2021 14:39 IST

iQOO Z3 5G Launch: iQOO Z3 5G स्मार्टफोनसोबत लाँच ऑफर देखील मिळत आहे.

Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने भारतात iQOO Z3 5G नावाचा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन दमदार Qualcomm Snapdragon 768G चिपसेट,400mAh बॅटरी आणि 55W फ्लॅश चार्जसह लाँच केला आहे. Snapdragon 768G सह लाँच झालेला हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे.  

iQOO Z3 5G चे स्पेसिफिकेशन्स 

iQOO Z3 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीने 6.58 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले पॅनल दिला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. हा iQOO फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 768G प्रोसेसरसह येतो. या फोनमधील 5 स्थरीय कूलिंग सिस्टम फोनचे तापमान 10 डिग्री सेल्सियसने कमी करते, असा दावा कंपनीने केला आहे.   

iQOO Z3 5G फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 64 मेगापिक्सलचा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP अल्ट्रावाइड–अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फेस अनलॉक सोबतच या फोनमध्ये साइड–माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे जो पावर बटणमध्ये एम्बेड केला गेला आहे. iQOO Z3 स्मार्टफोनमध्ये 4,400mAh ची बॅटरी आहे, जी  55W फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते.  

iQOO Z3 5G ची किंमत 

iQOO Z3 5G स्मार्टफोन भारतात तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 19,990 रुपये, 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिएंट 20,990 रुपये आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज 22,990 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे. या स्मार्टफोनची विक्री अमेझॉन आणि कंपनीच्या वेबसाईटवर आज दुपारी 1 वाजता सुरु झाली आहे. 

iQOO Z3 5G स्मार्टफोनसोबत लाँच ऑफर देखील मिळत आहे. या ऑफरअंतर्गत ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांचा कॅशबॅक डिस्काउंट आणि 1000 रुपयांचा डिस्काउंट अमेझॉन कुपनच्या माध्यमातून मिळत आहे. तसेच, कंपनीने 7 दिवस फोन वापरल्यानंतर रिर्टन करण्याची ऑफर दिली आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान