शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

या स्मार्टफोनवर दोन वर्षांची वॉरंटी; OnePlus च्या नाकात दम करण्यासाठी आला iQOO Neo 6 

By सिद्धेश जाधव | Updated: May 31, 2022 13:35 IST

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 80W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेरा देण्यात आला आहे.  

iQOO ने भारतात आपल्या नव्या सीरिजची सुरुवात केली आहे. कंपनीनं Neo सीरीजमध्ये iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन भारतात Snapdragon 870 5G प्रोसेसर, 80W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 64MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. iQOO Neo 6 स्मार्टफोन गेमिंग फोन म्हणून कंपनीनं सादर केला आहे, यात खास Cascade Cooling System देण्यात आली आहे.  

iQOO Neo 6 स्पेसिफिकेशन्स 

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये 6.62-इंचाचा FHD+ E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट 1200Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 निट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा OIS ला सपोर्टसह मिळतो. सोबत 8MP ची अल्ट्रावाईड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा आहे. यात 16MP चा सेल्फी शूटर देण्यात आला आहे.  

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा Snapdragon 870 प्रोसेसर देण्यात आला आहे. जो जुन्या जेनरेशनचा फ्लॅगशिप प्रोसेसर आहे. सोबत 12GB पर्यंतचा LPDDR4x RAM आणि 256GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. सोबत 4GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळतो. आयकूचा हा अँड्रॉइड 12 स्मार्टफोन फनटच ओएस 12 वर चालतो. यातील लिक्विड कूलिंग सिस्टम हेवी परफॉर्मन्सनंतर देखील फोन थंड ठेवते.  

iQOO Neo 6 स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच यात X-अ‍ॅक्सिस लीनियर व्हायब्रेशन मोटर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. तर कनेक्टिव्हिटीसाठी Bluetooth 5.2, NFC, 5G, 4G LTE आणि Wi-Fi मिळतो.    

iQOO Neo 6 ची किंमत  

iQOO Neo 6 स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 29,999 रुपये आहे. 12GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 33,999 रुपयांच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. कंपनीनं डार्क नोवा आणि सायबर रेज असे दोन कलर व्हेरिएंट सादर केले आहेत. हा फोन आजच अ‍ॅमेझॉनवर लिस्ट झाला आहे. ICICI बँकेच्या कार्ड धारकांना 3000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. या फोनवर कंपनी दोन वर्षांची वारंटी देत आहे.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान