शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

काही सेकंदात आउट-ऑफ-स्टॉक होणारा जबराट स्मार्टफोन येतोय; फ्लॅगशिप स्पेक्स मिळणार स्वस्तात, लाँचसाठी फक्त काही दिवस  

By सिद्धेश जाधव | Updated: February 4, 2022 13:06 IST

iQOO 9 Series India Luanch and Price: भारतात iQOO 9 series मध्ये तीन मॉडेल लाँच केले जातील. ज्यात iQOO 9 SE, iQOO 9, आणि iQOO 9 Pro चा समावेश असेल.

iQOO नं गेल्या महिन्यात चीनमध्ये iQOO 9 सीरिज सादर केली आहे. या सीरिज मध्ये iQOO 9 आणि iQOO 9 Pro  असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. जेव्हा हे स्मार्टफोन पहिल्यांदा विक्रीसाठी आले होते तेव्हा कंपनीनं अवघ्या 10 सेकंदात 100 कोटींपेक्षा जास्त किंमतीचे स्मार्टफोन्स विकले होते. आता ही सीरिज भारतीयांचा भेटीला येत आहे.  

iQOO 9 series India Luanch and Price

आता टेक युटूबर टेक्निकल गुरुजी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात iQOO 9 series मध्ये तीन मॉडेल लाँच केले जातील. ज्यात iQOO 9 SE, iQOO 9, आणि iQOO 9 Pro चा समावेश असेल. यातील SE मॉडेल देशात 35,000 रुपयांमध्ये लाँच केला जाईल. ज्यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 888 चिपसेट देण्यात येईल. तर iQOO 9 मध्ये स्नॅपड्रॅगन 888+ चिपसेट मिळेल.  

iQOO 9 आणि iQOO 9 Pro चे स्पेसिफिकेशन्स  

आयकू 9 5जी मध्ये 6.78 इंचाचा फुलएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात आला आहे. तर आयकू 9 प्रो मढी 6.78 इंचाच्या 2के क्वॉडएचडी+ ई5 अ‍ॅमोलेड एलटीपीओ 2.0 कर्व्ड स्क्रीन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500निट्स ब्राईटनेसला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएस बेस्ड ओरिजन ओएसवर चालतात. यात क्वॉलकॉमचा पॉवरफुल स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी मिळते.    

या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच मागे 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. आयकू 9 प्रो मध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 16 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. तर आयकू 9 च्या कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 12 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.    

आयकू 9 सीरीजच्या या दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोनमधील बॅटरी एक सारखी आहे. यातील 4,700एमएएचची बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगनं चार्ज करता येते. फक्त प्रो व्हर्जनमध्ये 50वॉट वायरलेस फास्ट चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स चार्जिंगचं फिचर मिळतं. 

हे देखील वाचा:

अर्ध्या किंमतीत विकत घ्या 43-इंचाचा धमाकेदार Smart TV; शानदार 4K डिस्प्लेसह 50W चे स्पीकर

16GB रॅम आणि 2TB स्टोरेजचा Asus चा दमदार लॅपटॉप भारतात आला; टच स्क्रीन डिस्प्लेसह मिळणार Windows 11 सपोर्ट

टॅग्स :VivoविवोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान