बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

By सिद्धेश जाधव | Published: July 22, 2021 04:48 PM2021-07-22T16:48:20+5:302021-07-22T16:48:58+5:30

iQOO 8 with 160W Fast Charge: iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 160W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो. या स्पीडने iQOO 8 स्मार्टफोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल.

Iqoo 8 could be the worlds fastest charging smartphone  | बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

बापरे! 160W फास्ट चार्जिंगसह लाँच होऊ शकतो iQOO 8; काही मिनिटांत होणार फुल चार्ज

googlenewsNext

कालच Vivo च्या सब-ब्रँड iQOO ची बातमी आली होती कि कंपनी आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 8 लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने चिनी सोशल मीडिया साईट विबोवर सांगतिले आहे कि, iQOO 8 स्मार्टफोन 4 ऑगस्टला लाँच केला जाईल. आता एका नवीन रिपोर्टमध्ये आगामी iQOO स्मार्टफोनच्या चार्जिंग स्पीडची माहिती मिळाली आहे. iQOO 8 स्मार्टफोन जगातील सर्वात फास्ट चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन असेल, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.  

आगामी iQOO 8 स्मार्टफोनचा एक पोस्टर लीक झाला आहे. या पोस्टरनुसार या फोनमध्ये FlashCharge टेक्नॉलॉजी दिली जाऊ शकते. परंतु या पोस्टरमध्ये चार्जिंग स्पीड सांगण्यात आला नाही. याआधी iQOO 8 मध्ये 120W चार्जिंग स्पीड असल्याची माहिती आली होती. परंतु, My Drivers च्या नवीन रिपोर्टनुसार iQOO 8 स्मार्टफोनमध्ये 160W फास्ट चार्जिंग स्पीड मिळू शकतो. या स्पीडने iQOO 8 स्मार्टफोन फक्त 12 मिनिटांत 0 ते 100 टक्के चार्ज होईल.  

iQOO 8 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

प्रसिद्ध लिक्सटर डिजीटल चॅट स्टेशनने iQOO 8 सीरिजचे स्पेसिफिकेशन्स लीक केले आहेत. लीकनुसार, iQOO 8 सीरीजच्या स्मार्टफोनमध्ये 12 जीबी रॅमसोबत 4 जीबी एक्सटेंडेड (वर्च्युल) रॅम देण्यात येईल. म्हणजे गरज पडल्यास तुम्ही फोनमधील रॅम 16 जीबीपर्यंत वाढवू शकता. iQOO 8 सीरीज स्मार्टफोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2K डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. या सीरिजमध्ये 4,000एमएएचची बॅटरी मिळू शकते. 

Web Title: Iqoo 8 could be the worlds fastest charging smartphone 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.