शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीत होणार आयपीएलचे प्रक्षेपण

By शेखर पाटील | Updated: January 19, 2018 13:53 IST

भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे.

हॉटस्टार या अ‍ॅपवरून आगामी आयपीएलला आता व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजेच आभासी सत्यतेत पाहता येणार असून याबाबत नुकतीच अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.भारतातील क्रिकेटवेडाबद्दल नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. यातच आयपीएलचे क्रिकेटला एक अतिशय आकर्षक आणि मनमोहक असे रूपडे प्रदान केले आहे. आता याच आयपीएलला व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी म्हणजे आभासी सत्यतेचा नवीन आयाम मिळणार आहे. हॉटस्टार या व्हिडीओ ऑन डिमांड सेवेला विवो आयपीएल-२०१८च्या डिजीटल प्रक्षेपणाचे अधिकार मिळाले आहेत. अर्थात कुणीही स्मार्टफोन युजर या अ‍ॅपवरून आयपीएलचे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकतो. यात नवीन ते काय? असे कुणीही म्हणू शकेल. मात्र या वर्षी आयपीएलचे सर्व सामने आभासी सत्यतेत पाहता येणार आहे. म्हणजेच कुणीही व्हीआर हेडसेटमध्ये आपला स्मार्टफोन ठेवून ३६० अंशात आयपीएलचे सामने पाहू शकतो. एका अर्थाने कुणीही स्वत: जणू काही सामना होत असलेल्या स्टेडियममध्ये उपस्थित असल्याची अनुभूती यातून घेऊ शकतो. यात नियमित प्रक्षेपणाशिवाय विशेष कॅमेरे लावण्यात आले आहे. याच्या मदतीने युजरला अगदी जीवंतपणाची अनुभूती येईल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यात एखादा क्षण पॉज करण्याची सुविधा दिलेली आहे. यानंतर स्मार्टफोन स्वाईप करून अथवा हलवून आपल्याला हव्या त्या कोनातून तो क्षण अनुभवू शकतो. तो आपल्याला हव्या त्या भाषेतील समालोचनाचा पर्याय निवडू शकतो. सर्वात महत्वाची बाब म्हणजे कुणीही युजर आपल्याला हव्या त्या कॅमेर्‍यातून सामना अथवा त्यातील कोणताही क्षण पाहू शकतो. सामना पाहत असतांना कुणीही आपले मते हॉटस्टार अ‍ॅपवर व्यक्त करू शकतो. यासाठी खास क्रिकेटच्या इमोजी तयार करण्यात आल्या आहेत. या वर्षीच्या आयपीएलचे सामने ४ एप्रिल ते ३१ मे २०१८ दरम्यान आयोजित करण्यात आलेले आहेत. अर्थात सुमारे दोन महिने आयपीएल चालणार आहे. तथापि, व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटीतील प्रक्षेपणामुळे सुमारे सहा महिन्यांपर्यंत आयपीएलचे महोत्सवी वातावरण टिकवण्याची तयारी हॉटस्टारची मालकी असणार्‍या स्टार इंडियाने केली आहे. या माध्यमातून सुमारे ७० कोटी युजर्सपर्यत पोहचण्याची तयारीदेखील करण्यात येत आहे.

टॅग्स :Cricketक्रिकेटIPL 2018आयपीएल 2018