शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

Best Android Smartphones: थेट आयफोनला टक्कर देतात 'हे' ५ प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 13:29 IST

iPhone vs Android Smartphones: भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात.

भारतात आयफोनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. परंतु, भारतीय बाजारात असे काही प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन आहेत, जे फीचर्स आणि डिझाइनच्या बाबतीत थेट आयफोनला टक्कर देतात. 

१) सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६सॅमसंगचा नुकताच लॉन्च झालेला सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ६ हा फोन ७.६ इंचाचा फोल्डेबल AMOLED २X डिस्प्ले आणि ६.३ इंचाचा कव्हर स्क्रीन बाजारात उपलब्ध ५आहे. मल्टीटास्किंग आणि फ्लेक्स मोड सारख्या फीचर्समुळे हा फोन एक शक्तिशाली फोन-टॅबलेट हायब्रिड बनतो. हा फोन २०२५ मधील सर्वोत्तम फोल्डेबल फोन आहे, असा दावा कंपनीने केला आहे. या फोनची किंमत १ लाख ५९ हजार ९९९ रुपये आहे.

२) सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ६ हा फोन १ लाख ०९ हजार ९९९ रुपयांत उपलब्ध आहे.  हा फोन स्टायलिश डिझाइन आणि फ्लॅगशिप परफॉर्मन्सचे चांगले मिश्रण आहे. ३.९ इंचाचा मोठा कव्हर डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन ८ जनरल ३ प्रोसेसर, १२ जीबी रॅम, ५० एमपी कॅमेरा आणि एआय आधारित बॅटरी ऑप्टिमायझेशनमुळे हा फोन आणखी आकर्षित ठरत आहे.

३) विवो एक्स २०० प्रोहा फोन जुलै-ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो आणि त्याची अंदाजे किंमत ९४ हजार ९९९ रुपये असल्याचे सांगितले जात आहे. यात ZEISS क्वाड कॅमेरा सेटअप, १ इंचाचा सोनी सेन्सर, पेरिस्कोप लेन्स आणि बेस्ट नाईट फोटोग्राफीसारखे पर्याय मिळेल. हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी ९४०० प्रोसेसरवर चालेल आणि १२०Hz रिफ्रेश रेटसह २K वक्र AMOLED डिस्प्ले असेल, अशी माहिती लीक झाली आहे.

४) मोटोरोला रेझर ५० अल्ट्रा मोटोरोला रेझर ५० अल्ट्रा हा फोन स्टायलिश लूकसह बाजारात दाखल झाला आहे, ज्याची किंमत ९९ हजार ९९९ रुपये इतकी आहे.  वॉटर रेझिस्टन्स आणि प्रीमियम व्हेगन लेदर बॉडीमुळे हा फोन ग्राहकांना आकर्षित करत आहे.

५) वनप्लस वन १ लाख ३९ हजार ९९९ रुपयांना मिळणारा हा वनप्लस ओपन हा फोल्डेबल फोन आहे, ज्यामध्ये जवळजवळ कोणतेही क्रीज नाहीत आणि व्हेगन लेदरसारखे फिनिशिंग मिळते. हा फोन स्नॅपड्रॅगन ८ जनरल २ प्रोसेसर आणि १६ जीबी रॅमने सुसज्ज आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. शिवाय, ४ हजार ८०५ एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळते, जी ६७ वॅटने सुपरफास्ट चार्ज होते आणि दिर्घकाळ टिकते.

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानsamsungसॅमसंगVivoविवोMotorolaमोटोरोला