शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

काय सांगता! मोबाईल नेटवर्कविना करता येणार कॉल्स; ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट LEO Satellite सपोर्ट  

By सिद्धेश जाधव | Updated: August 30, 2021 14:58 IST

iPhone 13 LEO Satellite Mode: iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो. iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील.

ठळक मुद्दे iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतीलiPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो

Apple आपल्या आगामी iPhone 13 सीरिजची जोरदार तयारी करत आहे. ही सीरिज 14 सप्टेंबरला सादर केली जाऊ शकते. या सीरिजमध्ये नवीन अपग्रेडसह कंपनी चार आयफोन सादर करू शकते. या सीरिजमध्ये छोटी नॉच, 120Hz रिफ्रेश रेट, Apple A15 प्रोसेसर आणि इतर अनेक बदल बघायला मिळू शकतात. तसेच आता प्रसिद्ध विश्लेषक Ming-Chi Kuo यांनी iPhone 13 सीरिजमधील क्रांतिकारी टेक्नॉलॉजीची माहिती दिली आहे. iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो, असे कुओ यांनी सांगितले आहे.  

LEO satellite communication mode म्हणजे काय?  

iPhone 13 सीरिजमधील LEO सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड का आहे क्रांतिकारी? सोप्प्या शब्दांत सांगायचे झाले तर iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील, तसेच फोन कॉल्स करता येतील. एखाद्या दुर्गम ठिकाणी गेल्यावर किंवा अश्या ठिकणी राहणाऱ्या लोकांसाठी, तसेच आपत्कालीन परिस्थितीत हा कम्युनिकेशन मोड खूप उपयुक्त ठरू शकतो.  

2019 मध्ये झाली होती सुरुवात  

Bloomberg ने 2019 मधेच अ‍ॅप्पलच्या टेक्नॉलॉजीची माहिती दिली होती. तेव्हापासून अ‍ॅप्पल सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचा वापर करून आयफोन्सवर डेटा पाठवण्याचा मार्ग शोधत आहे. परंतु हे फिचर iPhone 13 लाईनअपमध्ये मिळणार, अशी बातमी पहिल्यांदाच समोर आली आहे. भविष्यात हे फिचर अ‍ॅप्पल एअर हेडसेट, अ‍ॅप्पल कार आणि इतर अ‍ॅक्सेसरीजमध्ये मिळू शकते. iPhone 13 मध्ये Qualcomm X60 बेसबँड मॉडेम चिपचे कस्टम व्हर्जन मिळेल. या चिपमुळे सॅटेलाईट कम्युनिकेशन करता येईल, अशी माहिती कुओ यांनी दिली आहे.  

फक्त अ‍ॅप्पलच्या iMessage आणि FaceTime सर्व्हिसेस वापरून सॅटेलाईटद्वारे मेसेजस आणि कॉल्स करता येतील कि नाही याची माहिती अजूनतरी स्पष्ट झाली नाही. तसेच जीपीएसप्रमाणे हे फिचर मोफत असेल कि यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतील, हे देखील समजले नाही. अतापर्यंतचा इतिहास पाहता कंपनी या क्रांतिकारी टेक्नॉलॉजीसाठी पैसे आकारू शकते. तत्पूर्वी हे फिचर आगामी आयफोन्समध्ये मिळणार कि नाही हे आपल्याला 14 सप्टेंबरलाच समजू शकते.  

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान