शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला Apple iPhone 13 सीरीज होणार सादर; इथे बघता येईल लाईव्ह इव्हेंट 

By सिद्धेश जाधव | Updated: September 8, 2021 11:55 IST

Apple event 2021: Apple चा नवीन लाँच इव्हेंट 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे.

ठळक मुद्देअ‍ॅप्पलने 14 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. आगामी अ‍ॅप्पल वॉचचे फीचर्स इंटरनेटवर याआधी लीक झाले आहेत.

टेक दिग्गज Apple ने आपल्या नव्या लाँच इव्हेंटची घोषणा केली आहे. हा इव्हेंट येत्या 14 सेप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. कंपनीने या इव्हेंटला ‘California Streaming’ असे नाव दिले आहे. या इव्हेंटच्या माध्यमातून बहुप्रतीक्षित iPhone 13 series सादर होऊ शकते. या सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max लाँच केले जाऊ शकतात.  (Apple announces September 14 event for iPhone 13 and Apple Watch Serise 7)

Apple ने आपल्या आगामी इव्हेंटची घोषणा केली आहे. हा Apple event येत्या 14 सप्टेंबरला कॅलिफोर्निया येथील अ‍ॅप्पल पार्कमध्ये आयोजित करण्यात आला आहे. याची सुरवात 10:00 a.m. PDT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी होईल. अ‍ॅप्पल या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण करणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून iPhone 13 series चा लाँच इव्हेंट भारतीयांना देखील बघता येईल.  

अ‍ॅप्पल इव्हेंटमध्ये होणाऱ्या घोषणा  

अ‍ॅप्पलने 14 सप्टेंबरला होणाऱ्या लाँच इव्हेंटची माहिती दिली आहे. परंतु कंपनीने या इव्हेंटमध्ये कोणकोणते प्रोडक्टस लाँच होतील याची माहिती दिली नाही. मीडिया मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्सनुसार या इव्हेंटमधून आयफोन 13 सीरीज अंतगर्त iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max मॉडेल सादर केले जाऊ शकतात.  

Apple iPhone 13 series व्यतिरिक्त कंपनी 14 सप्टेंबरच्या अ‍ॅप्पल इव्हेंटमधून Apple Watch Series 7 देखील बाजारात आणू शकते. या आगामी अ‍ॅप्पल वॉचचे फीचर्स इंटरनेटवर याआधी लीक झाले आहेत. तसेच जूनमध्ये आयोजित WWDC 2021 इव्हेंटच्या मंचावरून अ‍ॅप्पलने iOS 15 सादर केला होता, हे नवीन आयओएस व्हर्जन देखील 14 सप्टेंबरला अधिकृतपणे रोलआउट केले जाऊ शकते. 

टॅग्स :Apple IncअॅपलSmartphoneस्मार्टफोन