शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

जिओच्या कॅशबॅक ऑफरसह मिळणार इंटेक्स उदय

By शेखर पाटील | Updated: April 17, 2018 08:54 IST

इंटेक्स कंपनीने आपला उदय हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून तो रिलायन्स जिओच्या कॅशबॅक ऑफरसह खरेदी करता येणार आहे.

इंटेक्स कंपनीने आपला उदय हा नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारला असून तो रिलायन्स जिओच्या कॅशबॅक ऑफरसह खरेदी करता येणार आहे. इंटेक्स उदय या स्मार्टफोनचे मूल्य ७,९९९ रूपये आहे. तथापि, रिलायन्स जिओने जाहीर केलेल्या ऑफरमधून यावर तब्बल २२०० रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. याच्या अंतर्गत ग्राहकाला प्रत्येकी ५० रूपयांचे ४४ व्हाऊचर्स मिळतील. यामुळे ग्राहकाला हा स्मार्टफोन ५,२९९ रूपयात पडणार आहे. इंटेक्स कंपनीने सातत्याने किफायतशीर दरातील स्मार्टफोन्सला प्राधान्य दिले आहे. उदय हे मॉडेलदेखील याच प्रकारातील आहे.

इंटेक्स उदय या मॉडेलमध्ये ५.२ इंच आकारमानाचा आणि एचडी म्हणजेच १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. यात मीडियाटेकचा क्वॉड-कोअर प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ३ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा दिलेली आहे. ऑटो-फोकस आणि एलईडी फ्लॅशसह यातील मुख्य कॅमेरा १३ मेगापिक्सल्सचा आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी यात एलईडी फ्लॅशयुक्त ५ मेगापिक्सल्सचा कॅमेरा दिलेला आहे. हे मॉडेल ब्लॅक, ब्ल्यू आणि शँपेन या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यासोबत कंपनीने डाटाबॅक या फिचरच्या अंतर्गत ग्राहकाला दरमहा ५०० एमबी मोफत डाटा देण्याचे जाहीर केले आहे. याच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनर दिलेले असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या आवृत्तीवर चालणारे आहे. यामध्ये २८०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइल