शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मायक्रोसॉफ्टचे सरफेस बुक 2 भारतात सादर

By शेखर पाटील | Updated: August 8, 2018 07:29 IST

मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक 2 हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत.

मायक्रोसॉफ्टने आपले सरफेस बुक २ हे उच्च श्रेणीतील लॅपटॉपचे मॉडेल भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात अनेक उत्तम फिचर्स आहेत. मायक्रोसॉफ्टने गत वर्षी सरफेस बुक २ हे मॉडेल जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली होती. आता याला भारतीय ग्राहकांसाठी सादर करण्यात आले आहे. हे टु-इन-वन या प्रकारातील मॉडेल असल्यामुळे याला लॅपटॉप आणि टॅबलेट या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे. या मॉडेल सोबत सरफेस पेनही वापरता येणार आहे. मायक्रोसॉफ्ट सरफेस बुक २ हा लॅपटॉप १३.५ आणि १५ इंच आकारमानाच्या डिस्प्लेमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील १३.५ इंची मॉडेलमध्ये ३००० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा तसेच पिक्सलसेन्स या प्रकारचा डिस्प्ले असेल. तर १५ इंची मॉडेलमध्ये ३४०० बाय २००० पिक्सल्स क्षमतेचा पिक्सलसेन्स या प्रकारातील डिस्प्ले देण्यात आला आहे. याच्या विविध व्हेरियंटमध्ये सातव्या पिढीतील कोअर आय-५ आणि आठव्या पिढीतील कोअर आय-७ हे अत्यंत गतीमान प्रोसेसर देण्यात आले आहेत. याशिवाय यात एनव्हिडीया जीफोर्स जीटीएक्स १०५० आणि जीटीएक्स १०६० हे ग्राफीक्स प्रोसेसर असतील. यातील विविध व्हेरियंटच्या रॅम ८ आणि १६ जीबी असतील. तर स्टोअरेजसाठी २५६ जीबी, ५१२ जीबी आणि १ टिबी असे पर्याय देण्यात आले आहेत.  

सरफेस बुक २ या लॅपटॉपमधील बॅटरी तब्बल १७ तासाचा बॅकअप देत असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीचा दावा आहे. यातील मुख्य कॅमेरा ८ तर फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल्स क्षमतेचा असेल. तर यात डॉल्बी ऑडिओ प्रिमीअमयुक्त स्पीकर व दोन मायक्रोफोनही आहेत. यात वाय-फाय, ब्ल्यु-टुथ आणि एक्सबॉक्स वायरलेसचा इनबिल्ट सपोर्ट दिला आहे. यासोबत दोन युएसबी ३.० टाईप-ए पोर्ट, एक युएसबी टाईप-सी पोर्ट, कार्ड रीडर, हेडफोन जॅक आदी फिचर्सही आहेत. तसेच यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, मॅग्नेटोमीटर व अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत. सरफेस बुक २ हा लॅपटॉप ६४ बीट विंडोज १० या प्रणालीवर चालणारा असेल. यात मायक्रोसॉफ्टचे सर्व प्रॉडक्टिव्हिटी टुल्स वापरता येतील. याच्या विविध व्हेरियंटचे मूल्य  १,३७,९९९ रूपयांपासून सुरू होणारे असून सर्वात हाय व्हेरियंटचे मूल्य २,९५,९९९ रूपये आहे. हा लॅपटॉप ग्राहकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये सादर करण्यात आला आहे.

टॅग्स :technologyतंत्रज्ञान