शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

फक्त 260 रुपयांमध्ये मिळवा 5000mAh बॅटरी असलेला फाडू स्मार्टफोन, चार रंगात होणार उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 09:34 IST

अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनल असलेला Infinix Smart 6 स्मार्टफोन आजपासून ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.  

Infinix नं गेल्या आठवड्यात एक हटके स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन अँटी-बॅक्टेरियल बॅक पॅनलसह सादर करण्यात आला होता. म्हणजे या फोनच्या बॅक पॅनलवर सूक्ष्मजंतू टिकत नाहीत, यासाठी खास कोटिंग देखील देण्यात आलं आहे. या बजेट-फ्रेंडली Infinix Smart 6 स्मार्टफोनची आजपासून भारतात विक्री सुरु होणार आहे. विशेष म्हणजे 4GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 8MP कॅमेरा असलेला हा डिवाइस फक्त 260 रुपयांमध्ये तुमचा होईल.  

Infinix Smart 6 ची किंमत आणि ऑफर्स  

Infinix Smart 6 च्या एकमेव 2GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडेलची किंमत 7,499 ठेवण्यात आली आहे. हा फोन फ्लिपकार्टवरून पोलर ब्लॅक, हार्ट ऑफ ओशियन, लाईट सी ग्रीन आणि स्टारी पर्पल अशा चार रंगात विकत घेता येईल. एसबीआयच्या क्रेडिट कार्ड धारकांना 10 टक्के डिस्काउंट दिला जाईल. तसेच तुम्ही 260  रुपयांच्या मासिक हप्त्यावर देखील हा हँडसेट घरी आणू शकता.  

Infinix Smart 6 चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix Smart 6 मध्ये 6.6-इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 720×1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 226PPI पिक्सल डेंसिटीला सपोर्ट करतो. डिवाइस Android 11 Go Edition वर चालतो.   प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो ए22 चिपसेट देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2GB RAM आणि 64GB स्टोरेजसह येतो. कंपनीनं 2GB वर्चुअल रॅम देखील दिला आहे. मेमरी देखील 512GB पर्यंत मायक्रो एसडी कार्डनं वाढवता येते.  

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 8MP चा मुख्य कॅमेरा आणि एक डेप्थ सेन्सर आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 5MP चा कॅमेरा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हा एक ड्युअल सिम 4G फोन आहे. ज्यात सिक्योरिटीसाठी रियर फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फिचर देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी Infinix Smart 6 मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ही बॅटरी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानMobileमोबाइलAndroidअँड्रॉईड