Infinix Smart 5A स्मार्टफोन होणार पुढल्या आठवड्यात लाँच; किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी 

By सिद्धेश जाधव | Published: July 29, 2021 02:58 PM2021-07-29T14:58:20+5:302021-07-29T15:02:26+5:30

इनफिनिक्स एक स्वस्त स्मार्टफोन भारतात Infinix Smart 5A नावाने सादर करणार आहे. हा लो बजेट इनफिनिक्स स्मार्टफोन 2 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो.

Infinix smart 5a to launch in india on 2 august  | Infinix Smart 5A स्मार्टफोन होणार पुढल्या आठवड्यात लाँच; किंमत 7,000 रुपयांपेक्षा कमी 

हा फोटो Infinix Smart 5 चा आहे.

googlenewsNext
ठळक मुद्देइनफिनिक्स एक स्वस्त स्मार्टफोन भारतात Infinix Smart 5A नावाने सादर करणार आहे. हा लो बजेट इनफिनिक्स स्मार्टफोन 2 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो.

कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्यासही Infinix कंपनी ओळखली जाते. लवकरच . इनफिनिक्स एक स्वस्त स्मार्टफोन भारतात Infinix Smart 5A नावाने सादर करणार आहे. हा लो बजेट इनफिनिक्स स्मार्टफोन 2 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. आगामी Infinix Smart 5A स्मार्टफोन फेब्रुवारीमध्ये लाँच झालेल्या Infinix Smart 5 चा डाउनग्रेड व्हर्जन असू शकतो.  

Infinix Smart 5A चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Infinix Smart 5A स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो, हा फोन टियर ड्रॉप नॉच डिस्प्लेसह येईल. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी मिळू शकते. स्मार्टफोनच्या मागे ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाऊ शकतो.  

Infinix Smart 5A ची किंमत 

Infinix Smart 5A स्मार्टफोन भारतात लो बजेट सेगमेंटमध्ये एंट्री घेऊ शकतो. या फोनची किंमत 7,000 रुपयांपर्यंत असू शकते, कारण Infinix Smart 5 स्मार्टफोन भारतात 7,200 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. Infinix Smart 5A भारतात फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. Infinix ने Smart 5A स्मार्टफोनच्या लाँचसाठी Jio सोबत भागेदारी केली आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन जियो एक्सक्लुसिव प्रोग्राम अंतगर्त विकत घेणाऱ्या ग्राहकांना 550 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. 

Infinix Smart 5 चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix Smart 5 स्मार्टफोनमध्ये 6.82 इंचाचा एचडी + डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक Helio G25 चिपसेटसह सादर केला गेला आहे. फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज आहे. Infinix Smart 5 स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी मिळते. या फोनमधील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा मिळेल. हा 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Web Title: Infinix smart 5a to launch in india on 2 august 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.