शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

5000mAh बॅटरी, 50MP असलेल्या स्वस्त गेमिंग फोनवर मिळतोय डिस्काउंट; 8GB RAM सह घेता येईल विकत  

By सिद्धेश जाधव | Updated: December 20, 2021 11:49 IST

Infinix Note 11S Price in India: Infinix Note 11S स्मार्टफोनचा आज पहिला सेल आहे. हा फोन 8GB RAM, 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.  

Infinix नं गेल्या आठवड्यात आपली Infinix Note 11 सीरीज भारतीय बाजारात उतरवली होती. आज या सीरिजमधील Infinix Note 11S च्या विक्रीला सुरुवात होणार आहे. हा फोन आज म्हणजे 20 डिसेंबरला दुपारी 12  वाजल्यापासून Flipkart वरून विकत घेता येईल. या फोनमध्ये 5000mAh Battery, 8GB RAM, 33W फास्ट चार्जिंग, आणि 120Hz रिफ्रेश रेट, असे फीचर्स मिळतात.  

Infinix Note 11S Price in India 

Infinix Note 11S चे दोन व्हेरिएंट भारतात आले आहेत. या फोनच्या 6GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 12,999 रुपये मोजावे लागतील. तर 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हेज ग्रीन, मिथ्रिल ग्रे आणि सिम्फनी स्यान कलरमध्ये येणाऱ्या या स्मार्टफोनवर एसबीआय कार्ड धारकांना 10 टक्क्यांचा डिस्काऊंट देण्यात येईल.  

Infinix Note 11S चे स्पेसिफिकेशन्स  

Infinix Note 11S स्मार्टफोनमध्ये 6.95-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या फोनमध्ये MediaTek Helio G96 चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते.   

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा, 2MP मॅक्रो लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. Infinix Note 11S मध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा इनफिनिक्स फोन Android 11 आधारित XOS 7.6 वर चालतो. यातील 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईडFlipkartफ्लिपकार्ट