शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

सिंगल चार्जवर तीन दिवसांचा बॅटरी बॅकअप; 9 हजारांच्या आत Infinix Hot 12 Play स्मार्टफोनची एंट्री 

By सिद्धेश जाधव | Updated: May 3, 2022 15:17 IST

Infinix Hot 12 Play स्मार्टफोन 6000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, 11GB रॅम आणि 13MP कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Infinix Hot 12 Play स्मार्टफोन सध्या थायलंडमध्ये सादर करण्यात आला आहे. लवकरच याची एंट्री भारतीय बाजारात देखील होऊ शकते. अलीकडेच कंपनीनं आपला अँटी बॅक्टेरियल बॅक पॅनल असलेला डिवाइस Infinix Smart 6 देशात आणला होता. Infinix Hot 12 Play स्मार्टफोन जागतिक बाजारात 6000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट, 11GB रॅम आणि 13MP कॅमेऱ्यासह आला आहे.  

Infinix Hot 12 Play चे स्पेसिफिकेशन 

Infinix Hot 12 Play मध्ये 6.82 इंचाचा HD+ आयपीएस टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 720x1612 पिक्सल रिजोल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. हा डिवाइस लेटेस्ट Android 12 आधारित XOS 1.6 UI वर चालतो. यात Helio G35 चिपसेटची प्रोसेसिंग पावर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 6GB RAM आणि 5GB व्हर्च्युअल रॅम असा एकूण 11GB RAM देण्यात आला आहे. यातील 128GB बिल्ट स्टोरेज मायक्रोएसडी कार्डनं वाढवता येते. 

कॅमेरा सेगमेंट पाहता, या स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि सेकंडरी AI सेन्सर क्वॉड एलईडी फ्लॅशसह मागे देण्यात आला आहे. फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. या ड्युअल सिम फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाईप सी-पोर्ट आणि हेडफोन जॅकसह रीरी फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपसाठी 6,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगसह मिळते. ही बॅटरी तीन दिवसांचा स्टँडबाय टाइम देते.  

Infinix Hot 12 Play ची किंमत 

Infinix Hot 12 Play ची किंमत थायलंड 3,999 THB अर्थात 8,890 भारतीय रुपयांच्या आसपास आहे. हा स्मार्टफोन Racing Black, Legend White, Origin Blue आणि Lucky Green विकत घेता येईल.  

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान