शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय दिवसातील चार तास खर्ची करतात मोबाईल अॅपच्या वापरावर; सर्व्हेतून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:09 IST

भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात.

ठळक मुद्देभारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. मोबाईलमधील अॅपच्या वापरावर खर्च होणारे चार तास म्हणजे सर्वसामान्य लोक करत असलेल्या आठ तासांच्या ड्युटीच्या निम्मा वेळ आहे

बंगळुरू, दि. 7- भारतात स्मार्ट फोन वापरता सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह असणारे भारतीय दिवसातील चार तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. मोबाईलमधील अॅपच्या वापरावर खर्च होणारे चार तास म्हणजे सर्वसामान्य लोक करत असलेल्या आठ तासांच्या ड्युटीच्या निम्मा वेळ आहे. भारतात अनेक नोकरीच्या ठिकाणी आठ तासांची शिफ्ट असते. अॅप्लिकेशनचं विश्लेषण करणारी संस्था अॅप अॅनीच्या मे 2017 मधील अभ्यासानुसार, अॅन्ड्रॉइड फोनमधील अॅपवर जास्त वेळ घालविणाऱ्यांच्या संख्येत भारत देश टॉप पाचमध्ये होता. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

भारतात एन्ड्रॉइड अॅपवर सगळ्यात जास्त सक्रिय असणारी वीस टक्के लोक आहेत. साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो.  क्षिण कोरिया, मेक्सिको, ब्राझिल आणि जपानच्या टॉप २० टक्के अँड्रॉइड युजर्सनंतर भारताच्या टॉप २० टक्के सर्वाधिक अॅक्टिव्ह अँड्रॉइड युजर्सचा क्रमांक लागतो. साऊथ कोरीया, मेक्सिको, ब्राझील आणि जपानमधील मोबाईल अॅपचा सर्वात जास्त वापर करणारे युजर्स दिवसातील पाच तास अॅप्सच्या वापरावर खर्च करतात.

विशेष म्हणजे भारतात मोबाईल अॅपचा जास्त वापर न करणारे युजर्सही दिवसातील दीड तास मोबाईलच्या वापरावर खर्च करतात. तसंच अति जास्त वापर आणि कमी वापर यांच्यामधील टप्प्यात येणारे युजर्स दिवसातील अडीच तास मोबाईल अॅपच्या वापरावर खर्च करतात. लोकांच्या सध्याच्या जीवनशैलीत फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडियाचा वापर महत्त्वाचा झाला आहे. तसंच या अॅपचा लोकांनी पटकन अवलंब केला असल्याचं,अॅप अॅनीने अहवालात म्हंटलं आहे. अॅप अॅनीने त्यांच्या सर्व्हेसाठी एन्ड्रॉइड वापरणाऱ्या दहा मोठ्या देशांचा अभ्यास केला. 

शॉपिंग अॅप्लिकेशन, ट्रॅव्हल आणि गेम यावर सगळ्यात जास्त वेळ खर्ची केला जातो. याच अॅपवर सरासरी वेळ घालविण्यात भारतीयांचा दुसरा क्रमांक होता. मोबाईल शॉपिंगवर प्रत्येक महिन्याला प्रत्येक युजर दिवसाला जवळपास 90 मिनीटं वेळ घालवतो. दक्षिण कोरीयातील लोक यामध्ये काही प्रमाणात पुढे असून 90 मिनिटांपेक्षा जास्त वेळ मोबाईल शॉपिंगवर घालवितात. तर फायनान्स अॅपवर भारतीय सरासरी अर्धा तासांचा वेळ दर महिन्याला घालवतात. ब्राझिलमधील लोक 45 मिनीटं तर दक्षिण कोरीयातील लोका एक तासांचा वेळ फायनान्स अॅपवर घालवतात. 

टॅग्स :Mobileमोबाइल