शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Meta नं आईला जॉबवरुन काढलं तर मुलगी खुश झाली, कारण ऐकून चक्रावून जाल! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 12:15 IST

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

नवी दिल्ली-

फेसबुकची पॅरेंट कंपनी असलेल्या मेटानं हजारो कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कर्मचारी कपातीमध्ये Shelly Kalish नावाच्या महिलेची नोकरीही गेली. पण यामुळे त्यांची ६ वर्षाची मुलगी मात्र खूष झाली आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार Shelly Kalish नं सांगितलं की त्यांची मुलगी सहा वर्षांची आहे. ती आपल्या आईची नोकरी गेल्यामुळे खूश झाली आहे. कारण आपल्याला आता आईसोबत जास्त वेळ व्यतित करता येणार यासाठी ती खूश झाली आहे. 

मेटानं नुकतंच ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं. यात बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांना नोकरीवरुन कोणत्या कारणावरुन काढून टाकण्यात आलं आहे याची माहितीच दिली गेलेली नाही. पण आपल्या आईची नोकरी गेल्यामुळे Shelly Kalish यांची मुलगी जाम आनंदी झाली आहे. 

Shelly Kalish यांनी सांगितलं की सकाळी साडेसहा वाजता उठून मेल चेक केला असता त्यांना कामावरुन काढून टाकण्यात आल्याचं कळलं. मेल वाचून त्या निराश झाल्या. कंपनीनं कामावरुन काढण्यात आल्याचं कळताच त्यांनी पतीला कॉल केला. पती आणि मुलगी घरी आल्यानंतर त्यांना मिठीच मारली. 

आपली नोकरी गेल्याचं त्यांनी मुलीला सांगितलं आणि मुलगी दु:खी होण्याऐवजी आनंदीच झाली. "नोकरी जाणं खूप निराशाजनक आणि दु:ख देणारं असतं. पण माझ्या लेकीची प्रतिक्रिया वेगळीच होती. नोकरी गेल्याचं कळताच तू सगळ्यात बेस्ट मॉम आहेस असं लेक म्हणाली आणि मला मिठी मारली. आता तुझ्यासोबत जास्त वेळ व्यतित करता येईल असं तिचं म्हणणं होतं", असं नोकरी गमावलेल्या Shelly Kalish म्हणाल्या.

टॅग्स :Metaमेटा