शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
2
Nitin Shete: मोठी बातमी! शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
6
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
7
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
8
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
9
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
10
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
11
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
12
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
13
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
14
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
15
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
16
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
17
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
18
VIDEO: शटल कॉक घेऊन उभा राहिला अन् जोरात कोसळला…; २५ वर्षाच्या तरुणाचा धक्कादायक मृत्यू
19
Shreyasi Joshi : पुण्याच्या लेकीची कमाल; आशियाई रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी पहिली भारतीय
20
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...

21 हजारांचा बंपर डिस्काउंट! 12GB RAM असलेला ‘या’ शक्तिशाली Oppo फोनवर मिळतेय बंपर सूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 16:43 IST

Oppo Reno 7 Pro 5G फोन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे.

Oppo नं काही दिवसांपूर्वी आपली फ्लॅगशिप रेनो सीरिज भारतात सादर केली होती. या सीरिजमधील Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोन सर्वात महागडा फोन होता. कंपनीनं या फोनची किंमत 47,990 रुपयांपासून सुरु केली होती. परंतु फ्लिपकार्ट या फोनवर डिस्काउंट, एक्सचेंज आणि बँक ऑफर्स देत आहे. त्यामुळे हा फोन फक्त 26,999 रुपयांमध्ये विकत घेता येत आहे.  

Oppo Reno 7 Pro 5G वरील ऑफर  

Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज मॉडेल 17 टक्के डिस्काउंटसह विकला जात आहे. त्यामुळे 48 हजारांच्या ऐवजी हा फोन 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला तर तुम्ही 13,000 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. म्हणजे एकूण डिस्काउंट 21 हजारांच्या वर जाऊन हा फोन 26,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. सोबत विविध बँक ऑफर्सही उपलब्ध आहेत. एसबीआयच्या क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांची बचत करता येईल.  

OPPO Reno 7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन 

6.55 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Reno 7 Pro बाजारात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओप्पोनं फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. 

हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड कलरओएस 12 वर चालतो. रेनो7 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 1200 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा ओप्पो फोन 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM सह बाजारात आला आहे आणि त्याला 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.  वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 7GB अतिरिक्त रॅम वाढवता येतो. म्हणजे एकूण 19GB RAM  मिळतो. 

या डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेन्सर सेल्फी फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. 

OPPO Reno 7 Pro 5G मधील बॅटरी देखील तेवढीच खास आहे. कंपनीनं यात ड्युअल बॅटरीचा वापर केला आहे, म्हणजे फोनमध्ये दोन बॅटरी सेल आहेत. ज्या प्रत्येकी 2,250एमएएचच्या क्षमतेसह येतात आणि मिळून 4,450एमएएचची पावर देतात. ही बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. 

हे देखील वाचा:

 

टॅग्स :oppoओप्पोMobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञान