शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

50MP + 64MP क्वॉड कॅमेरा, 12GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह Huawei P50 Pro लाँच; जाणून घ्या किंमत  

By सिद्धेश जाधव | Updated: July 30, 2021 12:26 IST

Huawei P50 Pro launch: Huawei P50 Pro मध्ये 50MP + 64MP + 40MP + 13MP क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो.

चीन स्मार्टफोन निर्माता कंपनी Huawei ने आपले दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन आपल्या गृह बाजारात सादर केले आहेत. कंपनीने आपल्या ‘पी50 सीरीज‘ मध्ये Huawei P50 आणि Huawei P50 Pro स्मार्टफोन लाँच केले आहेत. यातील Huawei P50 ची माहित तुम्ही इथे क्लीक करून वाचू शकता. या लेखात आपण 12GB रॅम, 512GB स्टोरेज, 50MP + 64MP क्वॉड कॅमेरा आणि 66W फास्ट चार्जिंग असलेल्या हुवावे पी50 प्रो ची माहिती घेणार आहोत.  

Huawei P50 Pro चे स्पेसिफिकेशन्स 

हुवावे पी50 प्रो मध्ये कंपनीने 1228 x 2700 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिला आहे. ही एक कर्व्ड स्क्रीन आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 300हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते. या फोनमध्ये ओएलईडी डिस्प्ले असल्यामुळे यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.  

Huawei P50 Pro कंपनीच्या HarmonyOS 2 आणि दोन वेगवेगळ्या प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. हुवावे पी50 प्रो चा एक मॉडेल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 चिपसेटवर चालतो तर दुसरा मॉडेल हुवावेच्या हायसिलिकॉन किरीन 9000 चिपसेटला सपोर्ट करतो. या हुवावे फोनमध्ये 12 जीबी पर्यंत रॅम आणि 512 जीबी पर्यांतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनमध्ये 256GB पर्यंतच्या नॅनो मेमरी कार्डचा वापर करता येतो.  

Huawei P50 Pro मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आहे, त्याला 64 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स, 40 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 13 मेगापिक्सलच्या वाईड अँगल लेन्सची जोड देण्यात आली आहे. हा फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या हुवावे फोनमध्ये 4,360एमएएचची बॅटरी आहे जी 66W वायर्ड आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन रिवर्स वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.  

Huawei P50 Pro ची किंमत 

हुवावे पी50 प्रो स्नॅपड्रॅगन मॉडेल  

  • 8GB रॅम + 128GB स्टोरेज - किंमत CNY 5,988 (अंदाजे 68,800 रुपये)  
  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज - किंमत CNY 6,488 (अंदाजे 74,500 रुपये)  
  • 8GB रॅम + 512GB स्टोरेज - किंमत CNY 7,488 (अंदाजे 86,000 रुपये)  

हुवावे पी50 प्रो किरीन मॉडेल  

  • 8GB रॅम + 256GB स्टोरेज - किंमत CNY 6,488 (अंदाजे 74,500 रुपये)  
  • 8GB रॅम + 512GB स्टोरेज - किंमत CNY 7,488 (अंदाजे 86,000 रुपये)  
  • 12GB रॅम + 512GB स्टोरेज - किंमत CNY 7,988 (अंदाजे 91,800 रुपये)  
टॅग्स :huaweiहुआवेSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान