शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

तुमच्या जुन्या फोनला असं बनवा CCTV कॅमेरा, करेल घराची सुरक्षा! जाणून घ्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 23:21 IST

सर्व्हिलान्स सिस्टिम बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. पण तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोनही सिक्योरिटी कॅमेरा म्हणून यूज करू शकता.

आता स्मार्टफोन हा मानवाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे. फोनमध्ये येणाऱ्या नवनव्या वैशिष्ट्यांमुळे लोक त्यांचा फोन नेहमीच बदलत असतात. तुमच्याकडेही जुना स्मार्टफोन असेल आणि तुम्हाला त्याचे काय करायवे? असा प्रश्न पडला असेल, तर तुमच्याकडे फोन सीसीटीव्ही कॅमेरा म्हणून वापरण्याचा पर्याय आहे. तुम्ही अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून हे करू शकता.

सर्व्हिलान्स सिस्टिम बसवण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागतात. पण तुमची इच्छा असेल, तर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोनही सिक्योरिटी कॅमेरा म्हणून यूज करू शकता. विशेष म्हणजे, यासाठी आपल्याला कोणतेही वेगळे अटॅचमेंट खरेदी करण्याची गरज नाही. याच्या सहाय्याने तुम्हाला केवळ लाइव्ह फुटेजच पाहता येणार नाही, तर डिव्हाइसमध्ये सर्व्हिलांन्स फुटेज सेव्हही करता येईल. जाणून घ्या स्टेप्स...

फोनमध्ये इंस्टॉल करा सिक्योरिटी कॅमरा अ‍ॅप -सर्वप्रथम आपल्याला आपल्या जुन्या फोनध्ये सिक्योरिटी कॅमेरा अ‍ॅप इंस्टॉल करावे लागेल. अशी अनेक अ‍ॅप्स गूगल प्ले स्टोर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर लिस्टेड आहेत. मात्र जे अ‍ॅप आपल्याला क्रॉस-प्लॅटफॉर्म फंक्शनॅलिटीशिवाय लोकल आणि क्लाऊड स्ट्रिमिंग आणि क्लाऊडवर फुटेज स्टोर करण्यासारखे अथवा मोशन डिटेक्ट अलर्ट्स पाठविण्यासारखे फीचर्स देईल, असे अ‍ॅप निवडायला हवे. असे एक अ‍ॅप आहे, Alfred DIY CCTV Home Camera आणि हे सेट करणेही सोपे आहे. 

1. तुमच्या जुन्या आणि नव्या (ज्या फोनवरून तुम्हाला सुरक्षा फुटेज पहायचे आहे), फोनवर Alfred DIY CCTV Home Camera अ‍ॅप डाउनलोड करा 2. आपल्या नव्या प्रायमरी फोनमध्ये अ‍ॅप ओपेने केल्यानंत, स्क्रीनवर दिसणाऱ्या सूचनांचे पालन करत, 'Start' वर टॅप करा. आता 'Viewer' निवडल्यानंतर, 'Next' वर टॅप करावे लागेल.3. यानंतर आपल्याला आपल्या Google Account च्या मदतीने Sign In करावे लागेल.4. जुन्या फोनवरही हीच प्रक्रिया करत आपल्याला 'Viewer' च्या एवजी 'Camera' निवडायचा आहे आणि त्याच Google अकाउंटला लॉगिन करायचे आहे.

सेटिंग्जमध्ये जाऊन, तुम्ही इतर आवश्यक बदल करू शकाल आणि जुन्या फोनच्या कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेले फीड आपण प्रायमरी फोनमध्ये दिसेल.

आपला जुन्हा फोन निश्चित ठिकाणी सेट करा...-आपण आपला जुना फोन CCTV कॅमेऱ्याप्रमाणे कुठेही सेट करू शकता आणि याचे फुटेज प्रायमरी फोनमध्येही बघू शकता. महत्वाचे म्हणजे, यासाठी दोन्ही फोन वायफाय अथवा इंटरनेटला कनेक्ट असायला हवेत. याच बरोबर आपल्याला एखाद्या पॉवर केबलने जुन्या फोनला पॉवर द्यावी लागेल. यामुळे तो डिस्चार्ज होणार नाही. आपण पॉवरबँक अथवा सरळ चार्जरचाही वापर करू शकतात.

टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलSmartphoneस्मार्टफोन