शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ग्रुप न बनवता एकाचवेळी अनेकांना WhatsApp मेसेज कसे पाठवायचे? जाणून घ्या  

By सिद्धेश जाधव | Updated: September 7, 2021 19:21 IST

Whatsapp Tips And Tricks: अनेकांना एकसाथ मेसेज पाठवण्याचा ग्रुप हा एकमेव मार्ग व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा वापर करू शकता.  

WhatsApp देशातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु या अ‍ॅपवरील ग्रुप्स मात्र त्रासदायक ठरू शकतात. एकाच वेळी अनेकांना मेसेज पाठवण्यासाठी ग्रुप्स उपयोगी पडतात. परंतु एकाच ग्रुपमध्ये सर्व असतीलच किंवा जे आहेत त्या सर्वांना तुम्हाला मेसेज पाठवायचाच असेल असे नाही. जे लोक व्हॉट्सअ‍ॅप एक्सपर्ट आहेत त्यांना माहित असेल कि अनेकांना एकसाथ मेसेज पाठवण्याचा ग्रुप हा एकमेव मार्ग व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध नाही. त्याऐवजी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा वापर करू शकता.  

Broadcast List म्हणजे काय? 

ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरच्या मदतीने तुम्ही एकाच वेळी तुमच्या कॉन्टॅक्टसमधील अनेकांना व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाठवू शकता. एकदा बनवलेली ब्रॉडकास्ट लिस्ट तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. या फिचरमुळे प्रत्येक प्रसंगासाठी नवीन ग्रुप बनवावा लागत नाही. तसेच तुम्ही या लिस्टला तुमच्या सोयीनुसार नाव देऊ शकता.  

व्हॉट्सअ‍ॅपवर ब्रॉडकास्ट लिस्ट फीचरचा वापर कसा करायचा  

एका ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये तुम्ही जास्तीत जास्त 256 कॉन्टॅक्टस अ‍ॅड करू शकता. या यादीत ज्यांचा समावेश करायचा आहे त्यांचा नंबर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असणे आवश्यक आहे.  

Broadcast List बनवण्यासाठी  

  • सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅपमध्ये वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉट्सवर क्लीक करा आणि ‘New broadcast’ वर क्लीक करा.  
  • आता तुम्हाला जे लोक या यादीत हवे आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर शोधा आणि ते सिलेक्ट करा  
  • कॉन्टॅक्टस सिलेक्ट करून झाल्यावर तळाला उजव्या कोपऱ्यात असलेल्या चेकमार्क वर क्लीक करा. तुमची ब्रॉडकास्ट लिस्ट तयार आहे.  

ब्रॉडकास्ट लिस्ट फिचरचा एक दोष म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्हाला मेसेज पाठवायचा आहे त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये तुमचा नंबर सेव असला पाहिजे. तरच तुमचा मेसेज त्या व्यक्तीला पोहोचेल.  

तुम्ही या ब्रॉडकास्ट लिस्टमधून कॉन्टॅक्टस काढू आणि जोडू देखील शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो करून ब्रॉडकास्ट लिस्ट एडिट करावी लागेल:  

  • सर्वप्रथम लिस्ट एडिट करायची आहे ती ओपन करा  
  • त्यानंतर तीन डॉट्सवर क्लिक करा आणि ‘Broadcast list info’ निवडा  
  • इथे तुम्ही या यादीचे नाव बदलू शकता, ‘Add recipients’ वर क्लिक करून नवीन कॉन्टॅक्टस अ‍ॅड करू शकता. 
  • ब्रॉडकास्ट लिस्टमधून कॉन्टॅक्ट काढून टाकण्यासाठी ‘Edit recipients’ वर क्लीक करून कॉन्टॅक्ट समोरील "x" वर क्लीक करा आणि त्यानंतर चेकमार्कवर क्लीक करा.  
टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप