शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या Aadhaar Card वर किती सिमकार्ड आहेत?; काही मिनिटांत मिळवा अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2021 23:44 IST

आपल्या नकळत बनावट कागदपत्रांच्या आधारेही आपल्या नावे सिमकार्ड घेतलं जाऊ शकतं, या प्रोसेसवरून तुम्हाला तुमच्या नावे किती सिमकार्ड आहेत याची माहिती मिळेल.

ओळख पटवून देण्यासाठी Aadhaar Card भारतीयांच्या कमी येतं. अनेक सरकारी योजनांसाठीही आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे आधार हे भारतीयांसाठी महत्त्वाचं दस्तऐवज बनलं आहे. बऱ्याचदा आधारचा दुरुपयोग सुद्धा केला जात असल्याच्या अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात.. दूरसंचार विभागानं (DoT)  यासाठी आपल्या वेबसाईटवर एक मोठा बदल केला आहे, ज्याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा होणार दुरुपयोग समजू शकतो. DoT च्या या नवीन सुविधेचा वापर करून तुम्ही सहज तुमच्या आधार नंबरचा वापर करून घेतलेल्या मोबाईल नंबरची माहिती मिळवू शकता. इतकेच नव्हे तर तुमच्या ओळखीचे नसलेले किंवा तुम्ही वापरत नसलेले नंबर्स तुम्ही डिस्कनेक्ट देखील करू शकता. यासाठी तुम्हाला TAFCOP वेबसाईटची मदत घ्यावी लागेल. 

  • सर्वप्रथम टेलीकॉम अ‍ॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कंज्यूमर (Telecom Analytics for Fraud Management) प्रोटेक्शन पोर्टल https://tafcop.dgtelecom.gov.in/ या वेबसाईटवर जा. 
  • इथे तुमचा आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर एंटर करा. 
  • त्यानंतर ‘रिक्वेस्ट ओटीपी’ वर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी सबमिट करा.  
  • आता तुमच्या आधार नंबरचा वापर करून विकत घेतलेले सर्व नंबर वेबसाईटवर दिसतील.  
  • इथून तुम्ही अनोळखी किंवा अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकता. 

TAFCOP पोर्टलचा उपयोग   तुम्ही एका आधार कार्ड नंबरवर फक्त 9 मोबाईल कनेक्शन घेऊ शकता, असे निर्देश डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉमने दिलेले आहेत. ज्या युजर्सच्या नावावर 9 पेक्षा जास्त कनेक्शन आहेत, त्यांना एसएमएसच्या माध्यमातून सूचना पाठवण्यात येईल. असे युजर्स या पोर्टलवर जाऊन वरील प्रक्रिया पूर्ण करून अनावश्यक नंबर रिपोर्ट आणि ब्लॉक करू शकतात.   

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMobileमोबाइल