शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

वेबकॅमविना टीव्हीवरून करता येणार व्हिडीओ कॉल; जियोने आणले भन्नाट फिचर 

By सिद्धेश जाधव | Updated: August 4, 2021 15:54 IST

Jio Fibre Video Calling: कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील.  

Reliance Jio सतत आपला ग्राहक वर्ग कायम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी नवनवीन सुविधा घेऊन येत असते. त्यानुसार कंपनीने अजून एक शानदार ऑफर Jio Fiber युजरसाठी सादर केली आहे. यामुळे जियो युजर थेट टेलिव्हिजनच्या मोठ्या स्क्रीनवर व्हिडीओ कॉलिंगचा आनंद घेऊ शकतील. यासाठी कंपनीने Jio Fiber Voice मध्ये नवीन अपडेट दिला आहे. यामुळे जियोफायबर युजर TV स्क्रीनच्या माध्यमातून HD व्हिडीओ कॉल्स करू शकतील.  

तुम्हाला तर माहित आहे कि वेबकॅम किंवा कॅमेरा असलेले टीव्ही भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून जियोने वेबकॅम म्हणून स्मार्टफोनचा वापर करण्याचा अपडेट दिला आहे. Jio Fiber Voice च्या या TV कॉलिंग सुविधेत तुमचा मोबाईल कॅमेरा वेबकॅमचे काम करेल. मोठ्या स्क्रीनवर आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना व्हिडीओ कॉलद्वारे बघण्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.  

TV वरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी  

  • सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये ‘JioJoin App’ डाउनलोड करा. 
  • अ‍ॅप फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तिथे तुमचा JioFiber नंबर टाकून डिवायस कनेक्ट करा. 
  • जियोफायबर आणि जियोजॉईन अ‍ॅप लिंक झाल्यानंतर आता तुमचा स्मार्टफोन कम्पॅनियन डिवायस बनेल. 
  • आता तुमच्या फोनमधील JioJoin App च्या सेटिंग्समध्ये जाऊन ‘Camera on Mobile’ फीचर ऑन करा. 
  • हे फीचर ऑन केल्यानंतर फोनचा कॅमेरा तुम्हाला वेबकॅमप्रमाणे वापरता येईल आणि घरातील टीव्हीवर तो कॉल व्हिडीओ सुरु राहील. 

जियोजॉईन अ‍ॅपच्या माध्यमातून स्मार्टफोन्स आणि Jio Set-Top Box सह 6 डिवायसेज एकसाथ कनेक्ट करता येतात. हे अ‍ॅप अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही स्मार्टफोन्सवर इन्स्टॉल करता येईल.  

टॅग्स :JioजिओSmartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान